शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊतून टिकाऊ’चा कानमंत्र!, कपड्यांपासून वस्तूंची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:14 IST

टॉयलेट पेपरचे रोल, रिकामी दो-यांची रिळे, वर्तमानपत्रे, कपड्यांचे तुकडे, कुल्फीच्या काड्या आदी साहित्य वापरुन अनोख्या बाहुल्या तयार केल्या जात आहेत.

ठळक मुद्देबाहुल्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही यशस्वी प्रयत्न जुन्या कपड्यांचा कचरा थांबवण्यासाठी इको रिगेन या संस्थेचा पुढाकार

पुणे : प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर, जमिनीमध्ये विघटन होत नसल्याने होणारी पर्यावरणाची हानी, आजूबाजूला वाढणारे कच-याचे ढीग ही सध्याची डोकेदुखी बनली आहे. यावर उपाय म्हणून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा कानमंत्र शहरात प्रत्यक्षात उतरवला जात आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर करुन बाहुल्या आणि जुन्या कपडयांपासून वस्तू बनवण्याचा फंडा अवलंबला जात आहे.पुण्यातील उद्योजिका लता तुम्मुरु यांच्यातर्फे कचरा आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या सामग्रीतून बाहुल्या बनवण्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेमध्ये ४० वर्षांपासून या क्षेत्रात काम करणा-या दिल्लीतील शीला चौधरी यांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. टॉयलेट पेपरचे रोल, रिकामी दो-यांची रिळे, वर्तमानपत्रे, कपड्यांचे तुकडे, कुल्फीच्या काड्या आदी साहित्य वापरुन अनोख्या बाहुल्या तयार केल्या जात आहेत. बाहुल्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.‘लोकमत’शी बोलताना तुम्मुरु म्हणाल्या, ‘सध्याच्या जमान्यात आपल्याला सर्व काही नवीन हवे असते. मात्र, जुने ते सोने हा कानमंत्र नेहमी लक्षात ठेवायला हवा. आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंचा कल्पकतेने वापर करुन नवीन वस्तूंच्या स्वरुपात त्यास मूर्त रुप देता येऊ शकते. प्लास्टिक, थर्माकोल अशा वस्तूंमुळे कच-याचे ढीग वाढतात आणि पर्यावरणाची हानी होते. हानी रोखण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करुन टिकाऊ वस्तू तयार करता येऊ शकतात. पुनर्प्रक्रिया केलेल्या सामग्रीतून तयार झालेल्या आकर्षक बाहुल्या घराची शोभा वाढवतात. दोन दिवसांच्या कार्यशाळेत सुमारे ५० जणांची सहभाग घेतला.’प्लास्टिकप्रमाणेच जुन्या कपड्यांचा कचरा ही मोठी समस्या आ वासून उभी आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार, उ्घड्यावर टाकलेल्या जुन्या कपड्यांचा कचरा कुजून त्यातून कार्बन डाय आॅक्साईड आणि मिथेनची निर्मिती होते. मिथेनमधून उष्णता उत्सर्जित झाल्याने तापमान वाढीस हातभार लागतो. या जुन्या कपड्यांचा कचरा थांबवण्यासाठी इको रिगेन या संस्थेने पुढाकार घेतला आहे. जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तूंची निर्मिती करण्यासाठी संस्था सरसावली आहे. दोन वर्षांपासून लोकांकडून जुने कपडे गोळा करण्यात येत असून, त्यावर प्रक्रिया करुन हँड बॅग, कॅरी बॅग, विद्यार्थ्यांसाठी सॅक, लॅपटॉप बॅग, प्रवासी बॅग, स्वयंपाकघरातील वस्तू आदींची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून पर्यावरणाचा -हास रोखण्यासह समाजातील दुर्बल घटकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे इको रिगेनचे संचालक स्वप्नील जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Puneपुणे