शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

तुमच्यातच पाहिली 'विठु माऊली', पंढरीच्या वारीचे सारथ्य करणाऱ्या एसटी चालकांचे भक्तांनी घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 19:17 IST

विविधरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या एसटी बसमधून आळंदी व देऊ येथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या...

ठळक मुद्दे आपल्या वाहनांतून संतांच्या पादुका जाणे, ही भाग्याची गोष्ट

राजानंद मोरे-पुणे : ‘लेकरा तुझ्यातच माझ्या विठ्ठलाला पाहिले...संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या बसरुपी पालखीचे सारथ्य  करणाऱ्या चालकाच्या गळ्यात पडून प्रत्यक्ष विठु माऊलीला भेटल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या एका ८० वर्षीय आजीबाईंची ही भावना...  ‘हे बोल ऐकून धन्य झालो. हा आमच्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. एसटीमधील पाच वर्षांच्या वारकरी सेवेचे सार्थक झाले,’ असे नतमस्तक होत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या बसरुपी पालखी रथाचे सारथ्य करणारे तुषार काशीद व शहाजी खोटे यांनी आपली भावना व्यक्त केली.

विविधरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या एसटी बसमधून आळंदी व देऊ येथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या. तसेच त्याच बसने या पादुका पुन्हा परत आणण्यात आल्या. या दोन्ही बसरुपी पालखी रथाचे सारथ्य केले अनुक्रमे तुषार काशीद व शहाजी खोटे यांनी. दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान देहू-आळंदी येथून पंढरपुरपर्यंत बसने वारकऱ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी इतर चालकांप्रमाणे त्यांच्यावरही यायची. त्यांच्या सेवेतच विठ्ठल दर्शन घडायचे. पण यंदा थेट रथाचे सारथ्यच करण्याचे भाग्य मिळाल्याचे ते सांगतात.------------काशीद हे मुळचे बारामती तालुक्यातील शिरसणे गावचे. ते एसटीमध्ये पाच वर्षांपुर्वी पिंपरी चिंचवड आगारात रुजू झाले. त्यांचे चुलते व चुलती दरवर्षी वारी करतात. आता चिखली येथे कुटूंबासह राहतात. ध्यानीमनी नसताना या बसवर संधी मिळाली. खुप भाग्यवान ठरलो. आळंदीतून निघाल्यापासून पुन्हा परतेपर्यंत ठिकठिकाणी वारकरी दर्शन घेत होते. फुलांचा वर्षाव करत होते. बसमधील भजन-कीर्तन, विठ्ठलाच्या जयघोषाने हा प्रवास कधी संपला कळलेच नाही. आळंदीत एका आजी रडत-रडत गळ्यात पडल्या आणि तुमच्यातच विठ्ठल बघितल्याचे म्हणाल्या. हे ऐकून धन्य झालो.--------------मुळचे बीड जिल्ह्यातील मुगगावचे असलेले शहाजी खोटे पाच वर्षांपासून तळेगाव आगारात कार्यरत आहेत. त्यांचे कुटूंब मुगगावमध्येच आहे.
त्यांनाही संत तुकाराम महाराजांच्या पादुका असलेली बस घेऊन पंढरपुर जायचे, हे अचानकच समजले. ते सांगतात, आमची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पंढरपुरला जायचे हे कळाले. तिथेच ऊर भरून आला. आई-वडील दिंडीसोबत पालखीला जायचे. मी फक्त एसटीने वारकऱ्यांना न्यायचो. पण यंदा संतांच्या पादुका नेण्याचे भाग्य लाभले. बसमध्ये भजन-किर्तनात मीही तल्लीन होत होतो. पंढरपुर आणि देहूमध्येही अनेकांनी माझेही दर्शन घेतल्याने सेवेचे सार्थक झाले. हा प्रवास स्वप्नवत होता.--------------एसटीने एवढी वर्ष वारकरी सेवा केली त्याचे सार्थक झाले आहे. आपल्या वाहनांतून संतांच्या पादुका जाणे, ही भाग्याची गोष्ट आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय ही वारी पार पडली.- यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ.

टॅग्स :PuneपुणेBus DriverबसचालकPandharpur Wariपंढरपूर वारी