शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 14:15 IST

"राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करत आहे," असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

Laxman Hake ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चितपट करत महायुतीने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. लाडकी बहीण योजनेसह ओबीसी समाजाचा मिळालेला भरघोस पाठिंबा, यामुळे महायुतीला ऐतिहासिक विजय साकारता आल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मंत्रि‍पदाची मागणी केली आहे. मला फक्त विधानपरिषद आमदारकी नको तर गृह किंवा अर्थखातं द्यावं, कारण मी राज्यात ५० टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे, अशी भूमिका हाके यांनी मांडली आहे. 

"मला फक्त विधान परिषद नको, कॅबिनेट मंत्रिपद हवं आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा इतर कोणतं कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं. कारण मी राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे," असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. 

मनोज जरांगेंवर निशाणा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केला होता. आता विधानसभा निवडणूक निकालानंतरही हाके यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे. "मनोज जरांगे यांना लोक कंटाळले आहेत. त्यांनी १३० जागा पाडायची भाषा केली, जिथं उमेदवार पाडण्यासाठी मेसेज दिला, तिथं ते उमेदवार मोठ्या मताधिक्याने लोक निवडून आले आहेत," अशा शब्दांत हाके यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024laxman hakeलक्ष्मण हाकेOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील