शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पालिकेचे राजकारण मला उमगले नाही- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:42 IST

माजी महापौर उल्हास ढोले-पाटील यांचा सत्कार समारंभ

पुणे : एकवेळ आमदार-खासदारकी, अगदी मुख्यमंत्रिपदासाठी केल्या जाणाऱ्या सर्व पातळ्यावरील राजकारणावर नियंत्रण ठेवता येईल; मात्र पालिकांच्या आणि त्यात पुणे महानगरपालिकेच्या राजकारणाचा अंदाज लावणे महाकठीण आहे. राजकीय जीवनात अनेक महापालिकांचे राजकारण जवळून अनुभवलेले असतानाही, अद्याप महानगरपालिकेचे राजकारण आपल्याला उमगले नसल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले. तुमच्यासोबत तुमची म्हणून वावरणारी माणसे पुणे मनपाच्या निवडणुका जाहीर होताच रंग बदलतात आणि कोण कुठे जाऊन बसेल, याचा नेम नसल्याचेही ते म्हणाले.माजी महापौर उल्हासराव ढोले-पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पवार यांच्या हस्ते सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, हैदराबादचे नवाब अहमद अलम खाँ, कमल ढोले पाटील, खासदार वंदना चव्हाण, आमदार विजय काळे, शंकर निम्हण, शंकर तोडकर, तसेच सत्कार समितीचे अध्यक्ष शशिकांत सुतार, रामभाऊ मोझे उपस्थित होते.पवार म्हणाले की, उल्हास ढोले-े पाटील यांनी व्यावसायिक पार्श्वभूमी नसतानादेखील गाई-म्हशींचा अभ्यास करून दुधाचा व्यवसाय वाढविला. व्यवसाय, शेती, शिक्षण आणि सर्वसामान्यांशी असलेले स्नेहाचे संबंध या जोरावर त्यांनी ३८ वर्षे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा विक्रम घडवला. त्यांनी अनेक राजकीय पक्ष बदलले असतील, परंतु त्यांनी स्नेहाचा पक्ष कधी सोडला नाही.ढोले पाटील म्हणाले की, आई वारली तेव्हा अगदी लहान होतो. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होती. त्या वेळी वहिनीने पुढाकार घेऊन आम्हाला वाढवले मी नक्की कोणत्या पक्षाचा याबाबतीत अनेकदा चेष्टा केली जाते; परंतु माझा शरद पवार हाच एकमेव पक्ष आहे. पवारांनी सोबत आणि साथ दिली म्हणून तरुन गेलो़ सर्व पक्षात माझे मित्र असल्याने महापौरपदाचा कार्यकाळ देखील सुखाने व्यथित झाला. सत्कार समितीचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष रामभाऊ मोझे यांनी प्रास्ताविक केले, तर समितीचे उपाध्यक्ष अरुण कुदळे यांनी आभार मानले.राजकीय आणि व्यावसायिक आदर्शच प्रस्थापित केलाभुजबळ म्हणाले की, दुधाचा रतीब घालून कार्यालयीन वेळेत मनपात येऊन महापौरांच्या खुर्चीची शोभा वाढवत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास उल्हास ढोले-पाटील यांनी प्राधान्य दिले. त्यांनी राजकीय आणि व्यावसायिक बांधिलकीची चुणूक दाखवत त्यांच्या वर्तनातून राजकीय आणि व्यावसायिक आदर्शच प्रस्थापित केला.पालकमंत्री बापट म्हणाले की, महापौराची निवडणूक आली की मनपात त्याकाळी गोल्डन गॅँग म्हणून परिचित असलेली मंडळी काय उद्योग करतील याचा भरवसा नसायचा आणि या गॅँगचे नेतृत्व ढोले-पाटील यांनी केले होते. शनिवारवाड्याच्या कट्ट्यावर बसून भेळ खात़ त्यांना महापौरपद, तर मला स्टॅँडिंग कमिटीचे अध्यक्षपद असा तह पाटील आणि माझ्यात ठरला होता. याप्रसंगी उल्हास ढोले-पाटील यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळातील अनेक किस्से आणि आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी महापौर मुक्ता टिळक यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण