शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मी भारतीय’ हीच ओळख ठळक व्हावी : पं. वसंत गाडगीळ; गुरूकुल प्रतिष्ठानतर्फे पुण्यात व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:58 IST

धर्माचे उल्लेख टाळून ‘मी भारतीय’ हीच ओळख ठळक करण्यासाठी यापुढे प्रयत्न करायला हवेत, असे मत पंडित वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देशंकराचार्यांनी केलेले कार्य राष्ट्रीय ऐक्याचेच होते : अशोक कामतज्ञान हाच परमात्मा असून तोच आपला धर्म : वसंत गाडगीळ

पुणे : देशाचे आणि भाषेचे बंधन न बाळगता सगळा भारत एक हे मनात बिंबवायचं असेल तर मी मराठी, मी पंजाबी, मी गुजराती असे प्रादेशिक टाळून आणि मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन अशा प्रकारचे धर्माचे उल्लेख टाळून ‘मी भारतीय’ हीच ओळख ठळक करण्यासाठी यापुढे प्रयत्न करायला हवेत, असे मत पंडित वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी ‘राष्ट्रीय ऐक्याचे कार्य’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. गुरुकुल प्रतिष्ठानच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख श. अ. कात्रे, मराठी विज्ञान परिषदेचे म. ना. गोगटे, मानसशास्त्राचे अभ्यासक डॉ. अविनाश चाफेकर आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत उपस्थित होते. ‘ज्ञानापलीकडे श्रेष्ठ काहीच नाही. ज्ञान हाच परमात्मा असून तोच आपला धर्म आहे’, असे सांगून गाडगीळ म्हणाले, ‘वेदांत, उपनिषदात, भगवद्गीतेत, पुराणात कुठल्याही प्राचीन वाङ्मयात हिंदू-हिंदुस्थान हा शब्द नाही. या भूभागावर आक्रमण झाले, तेव्हा सिंधु नदीच्या तीरावरचे म्हणून हिंदू हे नाव मिळाले. त्याचेच पुढे हिंदुस्थान असे नाव झाले. आम्ही आर्य आणि आमचा देश आर्यांचा ही तेव्हा ओळख होती. आज ‘मी भारतीय’ अशी भावना दृढ व्हायला हवी.’कामत म्हणाले, ‘आद्य शंकराचार्यांनी भारताची पदयात्रा करून चार दिशांना चार पीठे स्थापन केली. त्यातून विविध आचार्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास निर्माण केला. शंकराचार्यांनी केलेले हे कार्य राष्ट्रीय ऐक्याचेच होते. नव्या पिढीला या विषयाची माहिती होणे आवश्यक असून त्यादृष्टीनं प्रयत्न करायला हवेत.’‘मध्यप्रदेश शासनाने शंकराचार्य यांच्या व्यापक कार्याची ओळख करून देण्यासाठी एकात्मता यात्रा आयोजित केली होती. राज्यातील सामान्य प्रजाजनांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र शासनानं सुद्धा नव्या पिढीला राष्ट्रीय कार्याची माहिती व्हावी यासाठी अशा पद्धतीचा उपक्रम राबवावा’, अशी इच्छा कामत यांनी यावेळी व्यक्त केली. प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी निवेदन केले.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ