शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ पुण्यासाठी ह्यमिशन २०२०ह्णअधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा सहभाग वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:24 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये पुणे शहराचा स्वच्छतेचा दर्जा १० वरून ३७ क्रमांकापर्यंत घसरला. यानंतर प्रशासनावर सर्व स्तरांतून जोरदार टीका करण्यात आली.

पुणे - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये पुणे शहराचा स्वच्छतेचा दर्जा १० वरून ३७ क्रमांकापर्यंत घसरला. यानंतर प्रशासनावर सर्व स्तरांतून जोरदार टीका करण्यात आली. यामुळे प्रशासनाने आता स्वच्छ पुणे शहरासाठी ‘मिशन २०२०’ हाती घेतले आहे. यामध्ये पुणे शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा थेट सहभाग वाढविण्यात येणार आहे.महापालिका प्रशासनाने सन २०१८-१९ या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हिरिरीने सहभाग घेतला होता. महापालिका आयुक्त, महापौरासह सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी दोन महिने आपआपल्या भागामध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु यामध्ये ग्राऊंडपातळीवर जाऊन काम न झाल्याने शहराचा स्वच्छतेचा दर्जा घसरल्याचे समोर आले. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आतापासूनच म्हणजे वर्षभर ‘मिशन २०२०’ हाती घेतले आहे. या मिशन अंतर्गतच ‘व्हीजन ० ते १००’ देखील राबविण्यात येणार आहे.स्वच्छतेची जबाबदारी सर्वांचीशहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शहरामध्ये राहणाºया प्रत्येक नागरिकाची आहे. यामुळे आता यापुढे महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान हाती घेण्यात येणार आहे. हे अभियान केवळ सर्वेक्षण अभियानापुरते न ठेवता नियमितपणे जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय कर्मचाºयाचे प्रशिक्षण, जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थाचा सहभग वाढविण्यात येणार आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र निधी खर्च न करता नागरिकांचा सहभाग, सीएसआर निधी आदी माध्यमांतून विविध कामे करण्यात येणार आहेत.-ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा विभागप्रमुखडंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करणारएनजीटीने महापालिका प्रशासनाला सन २०१९ अखेरपर्यंत फुरसुंगी येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये येत्या काही महिन्यांत शहरामध्ये निर्माण होणारा कचरा शंभर टक्के शहरामध्येच जिरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांकडून गोळा करण्यात येणारा कचरा शंभर टक्के वर्गीकरण करूनच मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी स्वच्छता कर्मचाºयांसह नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.शहरातील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये कचरा जिरविण्यावर भर असणार आहे. ओला आणि सुक्या कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिकेचे विशेष लक्ष असेल. कारण आज अनेक ठिकाणी वर्गीकरण होत नाही.

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका