शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

अवजड वाहनांवर हायड्रॉलिकने कारवाई, वाहतूक पोलिसांकडून चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 03:27 IST

‘नो पार्किंग’मधील दुचाकी वाहने उचलण्यासाठी हातघाई करणारी निळ्या टेम्पोतील मुले आता कालबाह्य होणार आहेत. नो पार्किंगमधील दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हायड्रॉलिक टेम्पोचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, चारचाकीवरील कारवाईची प्रचलित पद्धतदेखील बदलणार आहे.

- विशाल शिर्केपुणे : ‘नो पार्किंग’मधील दुचाकी वाहने उचलण्यासाठी हातघाई करणारी निळ्या टेम्पोतील मुले आता कालबाह्य होणार आहेत. नो पार्किंगमधील दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हायड्रॉलिक टेम्पोचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, चारचाकीवरील कारवाईची प्रचलित पद्धतदेखील बदलणार आहे. नुकतीच या नवीन प्रणालीची चाचणी घेण्यात आली.नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा निळा टेम्पो शहरात सर्रास फिरताना दिसतो. नो पार्किंगमध्ये वाहन दिसले की, त्यातून काही मुले खाली उतरून भराभर हाताने वाहने उचलून टेम्पोमध्ये चढविताना दिसतात. मात्र, यातून बºयाचदा साडेतीनशे सीसीची अवजड वाहने सुटत होती. तसेच दुचाकी उचलताना ती कशीही टेम्पोत आदळत असल्याने त्यांच्या नुकसानीची शक्यतादेखील वाढत होती. टेम्पोचे मागील दार खाली घेऊन, त्याचा वापरही दुचाकी ठेवण्यासाठी केला जात होता. चारचाकी वाहने उचलताना पुढील दोन चाक एका ट्रॉलीमध्ये अडकवून, गाडी ओढून नेली जात. आता ही पद्धत बंद करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी आॅगस्ट २०१७मध्ये त्यावर एक प्रस्ताव तयार केला असून, त्याच्या कामाला आता गती आली आहे.नो पार्किंगमधील मोपेडपासून ते २२९ किलो वजनाची कोणतीही स्पोर्ट बाईकसुद्धा सफाईदारपणे उचलता येईल, याचा विचार या प्रस्तावामध्ये करण्यात आला आहे. बुलेटसारखी अवजड दुचाकी असो की हर्ले डेव्हीडसनसारखी बाईक, त्यावरदेखील योग्य कारवाई करणे शक्य होणार आहे. छत नसलेले हायड्रॉलिक टेम्पो तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन उचलण्यासाठी अवघी एक व्यक्तीदेखील पुरेशी ठरू शकेल.चारचाकी वाहनांवर कारवाई करतानादेखील यापूर्वी मर्यादा येत होत्या. कारवाईदरम्यान आलिशान कारचे नुकसान झाल्याच्या तक्रारी व्हयाच्या. आता अगदी स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) आणि इतर आलिशान गाड्यांवरदेखील कारवाई करता येईल. या वाहनांची चारही चाके गाडी उचलून नेणाºया व्हॅनला जोडण्यात आलेल्या ट्रॉलीवर असतील. अगदी सहाशे किलोपासून ते अडीच हजार किलो वजनाची अवजड वाहनेदेखील ओढून नेता येतील. या कारवाईसाठी शहरात १० क्रेन आणि २५ टेम्पो तैनात करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्पसध्या प्रगतिपथावर असून, त्याची निविदा काढण्याचे काम सुरू आहे. ही वाहने रात्रीच्या वेळी तसेच, कमी दृश्यमानता असलेल्या स्थितीतदेखील काम करू शकतील.दुचाकी उचलल्यास २०० रुपये शुल्क!नो पार्किंगमधील वाहन उचलून नेल्यास सध्या दुचाकीसाठी ४०, तीनचाकी १०० आणि चारचाकीसाठी अडीचशे रुपये (टोर्इंग चार्जेस) शुल्क आकारले जाते. नवीन प्रणाली लागू झाल्यास दुचाकीला २०० आणि चारचाकीसाठी ४०० रुपये टोर्इंग चार्जेस आकारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या शुल्कात दोन ते चारपट वाढ होणार आहे. गाडीची कागदपत्रे, वाहन परवाना अशी कागदपत्रे नसल्यास त्याचा दंड वेगळा आकारण्यात येईल. त्यामुळे दंडात मोठी वाढणार असल्याने, टोर्इंग शुल्कवाढीस तीव्र विरोध असेल. असा प्रस्ताव मान्य करु नये, अशी मागणी लोकहित फाउंडेशनच्या अजहर खान यांनी सरकारकडे केली़नवीन यंत्रणा का ?पुण्याचे क्षेत्रफळ सातशे चौरस किलोमीटर असून, रस्त्याची लांबी सुमारे२ हजार किलोमीटर इतकी आहे. शहरातही दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सप्टेंबर २०१५ अखेरीस शहरातील वाहनांची संख्या २८ लाखांवर पोहोचली होती. दरमहा सरासरी ६ हजार नवीन वाहनांची त्यात भर पडत आहे. दिवसातील ठरावीक काळात, तर एकाच वेळी ३ लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर असतात. सुरळीत वाहतुकीसाठी रस्ता अडथळामुक्त असणे गरजेचे असते.वाहतूक पोलिसांच्या नियोजन विभागाचे निरीक्षक विवेकानंद वाखारे म्हणाले, नवीन प्रणाली राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. काही इच्छुकांनी वाहतूक विभागाला त्याचे सादरीकरण देखील केले आहे. नजीकच्या काळात हॉयड्रॉलिक प्रणालीची वाहने येऊ शकतात.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसPuneपुणे