चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:56+5:302021-02-25T04:13:56+5:30

राजू दुसाणे (रा. आकाशनगर, वारजे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना वारजे येथील राहत्या घरी ३० जानेवारी २०१५ ...

Husband sentenced to life imprisonment for murdering wife on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस आजन्म कारावास

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस आजन्म कारावास

Next

राजू दुसाणे (रा. आकाशनगर, वारजे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना वारजे येथील राहत्या घरी ३० जानेवारी २०१५ मध्ये घडली होती. राजू याने आपली पत्नी सविता हिच्यावर कुऱ्हाडीने वार करुन तिचा खून केला होता. विनाेद दाभाडे (रा. वारजे जकात नाक्याजवळ) यांनी फिर्याद दिली होती. दुसाणे दामपत्याला २ मुली व एक मुलगा आहे. या घटनेपूर्वी एक महिना आधी सविता हिला एक फोन आला होता. हे राजू याने पाहिले होते. तेव्हापासून तो सविताच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. एकदा त्याने सविता हिच्या साडीचा पदरही पेटवून दिला होता. तिच्या मुलीने ही आग विझविली होती. चारित्र्याच्या संशयावरून घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी राजू याने सवितावर कुऱ्हाडीने वार करुन तिचा खून केला. त्यानंतर तो रक्ताने भरलेल्या कपड्यांसह वारजे पोलीस ठाण्यात हजर झाला. तेथील पोलिसांना मी पत्नीचा खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन घरी गेले. तेव्हा सविता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या मानेवर व डोक्यावर वार केले होते.

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी ९ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने राजू दुसाणे याला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली.

---

हा खटला परिस्थिती जन्य पुराव्यावर आधारीत होता. तसेच आरोपींचे कपडे आणि कु-हाड जप्त केली होती. वैद्यकीय अहवाल व इतर बाबींवर गुन्हा सिद्ध करता आला.

- ॲड. सुनील मोरे, सरकारी वकील

Web Title: Husband sentenced to life imprisonment for murdering wife on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.