शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीची स्काईपवरून घटस्फोटावर मोहर, अमेरिकेतून पतीने साधला थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:18 IST

पुणे : पती क्षयरोगाने आजारी पडल्यानंतर, त्याची काळजी घेण्याऐवजी ती त्याला सोडून निघून गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही.

पुणे : पती क्षयरोगाने आजारी पडल्यानंतर, त्याची काळजी घेण्याऐवजी ती त्याला सोडून निघून गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. दरम्यानच्या काळात त्याचा आजार बरा झाला, त्यानंतर अमेरिकेला चांगल्या वेतनाची नोकरी मिळाली. पटत नसल्याच्या कारणावरून त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावत, घटस्फोट ठरविले. मात्र, त्याला परदेशातून न्यायालयातील तारखांना वारंवार उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्याच्या वकिलांनी न्यायालयात स्काईप या तंत्राचा वापर करण्याचा मार्ग सुचविला. अखेर त्या दोघांचा न्यायालयात स्काईपवरून परस्पर संमतीने घटस्फोट झाला.शिवाजीनगर न्यायालयात नुकताच हा घटस्फोट मंजूर झाला. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश दीपाली कडुस्कर यांच्या न्यायालयात हा दावा नुकताच निकाली काढण्यात आला. या उच्चशिक्षित दाम्पत्याचे जुलै २०१३ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर त्या दोघांचे पटत नव्हते. त्यातच पती आजारी असताना त्याची काळजी घेण्याऐवजी ती त्याला सोडून गेली. त्याला उपचाराची गरज असताना ती तिच्याबरोबर नव्हती. तिचे वागणे म्हणजे मानसिक क्रौर्य असून, तिच्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून त्याने न्यायालयात दावा दाखल केला होता. तिच्याकडूनही दावा दाखल करण्यात आला होता.दरम्यानच्या काळात त्याला अमेरिकेला नोकरी मिळाली. त्यामुळे तो तिकडे गेला होता. न्यायालयातील तारखांना वारंवार हजर राहणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे त्याचे वकील अ‍ॅड. जे. पी. बारमेडा आणि अ‍ॅड. शीतल भुतडा यांनी स्काईप या तंत्राद्वारे त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले. न्यायालयानेत्याच्या कागदपत्रांची तपासणी केली; तसेच संबंधित व्यक्ती तिच असल्याची खातरजमा केली.त्यानंतर परस्परसंमतीने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.

टॅग्स :Divorceघटस्फोटPuneपुणे