शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या पती-पत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 15:34 IST

बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधील दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या पतीपत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे५ लाख ७४ हजार ३०० रुपयांचे २०२ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत साळुंखे पतीपत्नी ताब्यात, ५ गुन्हे केल्याचे केले कबुल

पुणे : बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधील दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या पतीपत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आले असून ५ लाख ७४ हजार ३०० रुपयांचे २०२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.विनोद शामराव साळुंखे (वय ५०) आणि शामला विनोद साळुंखे (वय ४६, दोघे रा़ अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ अंजाळ, ता़ जत, जि़ सांगली) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले, की कमल बाबुराव वाकुर्डेकर (वय ५५, रा़ बोरी बुद्रुक, ता़ जुन्नर) या  आपली मुलगी स्मिता सावंत हिच्या नवी सांगवी येथील घरातून मुलगा सचिन याच्या धनकवडीतील घरी जाण्यासाठी १९ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता पिंपळेगुरव ते भारती विद्यापीठ या बसने प्रवास करीत होत्या़ गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या पर्समधील आतल्या कप्प्याची चैन उघडून त्यातील छोट्या पर्समधील ३५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व १ हजार रुपये चोरुन नेले होते.भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना महिलांच्या पर्समधील दागिने चोरणारे स्त्रीपुरुष भारती विद्यापीठसमोरील बसस्टॉपवर असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार त्यांनी साळुंखे पतीपत्नीला ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ५ गुन्हे केल्याचे कबुल केले आहे़ त्यांच्याकडून ५ लाख ७४ हजार ३०० रुपयांचे २०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, समीर बागसिराज, योगेश सूळ, बाबा नरळे, सुमित मोघे यांच्या पथकाने केली आहे़ 

टॅग्स :Puneपुणे