शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेकोट्यांबरोबरच खेड तालुक्यात रंगू लागल्या हुरडा पार्ट्या; वाढत्या थंडीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:13 IST

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात थंडीचा पारा वाढल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्यांबरोबरच हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. सकाळी व संध्याकाळी दवबिंदूचे चहूकडे सडे पडत आहेत.

ठळक मुद्देहुडहुडीने नागरिक थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पेटवू लागला शेकोट्या हुरड्याला मागणी वाढू लागल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना निर्माण झाला हक्काचा रोजगार

चासकमान : सध्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागात थंडीचा पारा वाढल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्यांबरोबरच हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत.कडूस, चासकमान परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात थंडी पडत असल्यामुळे संध्याकाळच्या प्रहरी व सकाळच्या प्रहरी गावागावांमध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत.  दुपारच्या प्रहरी कोवळे ऊन पडत आहे. ग्रामीण भागात हुडहुडीने तरुण व आबालवृद्ध नागरिक थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवू लागला आहे.तसेच ग्रामीण भागातील नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी कपड्यांच्या दुकानात स्वेटर, जर्कीन, कानटोपी, हातमौजे खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागला आहे.तसेच परिसरात शेतकरी हरभरा, मका, ज्वारी आदी पिके शेतकरी घेत असल्याने परिसरात हुरडा पार्टी, शेकोट्यावर भाजलेला हरभरा, उकडलेला मका आदींना शहरी, तसेच निमशहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात येऊन पार्टी करू लागला आहे. यामुळे ग्रामीण भागातील हुरड्याला दिवसेंदिवस मागणी वाढू लागल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा रोजगार निर्माण झाला असल्याचे शुभम गुरव, विशाल भोर, संदीप नेहेरे, विशाल जावळे, अक्षय मोढवे, प्रदीप पांगारे, नंदू मुसळे, अतुल मोढवे आदी शेतकऱ्यांनी सांगितले.थंडीमध्ये वाढ झाली असल्यामुळे ज्वारीपिकांमध्ये वाढ होऊन टपोरे दाणे भरण्यास सुरुवात झाली असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक ऐन थंडीमध्ये हुरडा पार्टी करू लागला आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असल्याने शेतकºयांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने परिसरात थंडी सतत पडत असते. सकाळी व संध्याकाळी दवबिंदूचे चहूकडे सडे पडत आहेत.

टॅग्स :Puneपुणे