शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 14:28 IST

मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे

ठळक मुद्दे मावळ भागांमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीचे वाढले प्रमाण गावातील ठराविक नागरिकांना बंदुकीचे परवाने, मात्र शिकारीसाठी सर्रास वापर

कामशेत : मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे. या भागांमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीची मजा घेण्याचे प्रमाण काही वर्षांमध्ये वाढले आहे. यासह वृक्षतोड, बेकायदा उत्खननही वाढले आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे जीवन तर धोक्यात आलेच; तसेच वनविभागातील जंगले नष्ट होऊ लागली आहेत. मावळ तालुका हा निसर्गसृष्टीने व नैसर्गिक संसाधन सामग्रीने बहरला असून, मावळातील निसर्गसृष्टी पाहण्यासाठी अनेक पर्यटक मावळात भेट देत आहेत. मावळातील अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात दाट वनराई, जंगले असल्याने येथे बऱ्याच प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असतो. दरम्यान, गावातील काही ठराविक नागरिकांना बंदुकीचे परवाने दिले असून, या बंदुकीचा विधायक कामासाठी वापर न करता अनेकजण सर्रास शिकारीसाठी वापर करण्याचे प्रकार वाढले आहे. यातच अनेकांकडे बेकायदा बंदूकही आहेत असे अनेक निसर्गप्रेमी सांगतात. स्थानिकांनी शेतीबरोबर शिकार करणे, मुंबई-पुणे व आजूबाजूच्या प्रमुख शहरांतील प्रतिष्ठित नागरिकांना शिकारीचे सावज कोठे मिळेल, शिकार कशी करायची या बरोबरच एखाद्या प्राण्याची केलेली शिकार व त्याची मेजवानी आदी बंदोबस्त करणे यासारखा जोडधंदाच सुरु केला आहे. यामुळेच शहरी भागातील अनेक अधिकृत व अनधिकृत बंदूकधारी शिकारीसाठी मावळला पसंती देत आहेत. प्रामुख्याने या शिकारी सुटीच्या दिवशी होत असून, शहरी भागातील पाहुणे येणार म्हणून त्यांच्यासाठी खास बेत व पूर्वनियोजनही केले जात आहे.नाणे, अंदर, पवन मावळातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भागांमध्ये मोठी वनराई जंगले, मोठी धरणे, तलाव, ओढे, गावतळी असून, डोंगर पठारावरील जंगलातील पाणी कमी झाल्यास वन्यप्राणी या पाण्याच्या ठिकाणी पाणवठ्यावर येतात. या प्राण्यांकडून कोणाच्याही जीविताला अद्यापपर्यंत धोका निर्माण झालेला नाही. तरीही अनेक जण येथे शिकार करतात. या शिकारींमध्ये प्रामुख्याने रानडुक्कर, सायाळ, ससे, मोर, लांडोर आदी प्राण्यांचा समावेश असतो. शहरात राहणाऱ्या मित्रमंडळींना  पार्ट्यांचे आमंत्रण पाठवून पारंगत आहेत. या सर्वांत ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील बहुतेकांनी हा रोजगार बनवला आहे. तर गावातील अनेक तरुण व्यसनाच्या अधीन होऊ लागले आहेत. मावळातील वाढलेल्या शिकारींमध्ये गावातील स्थानिकांबरोबर अनेक मोठ्या शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. मुंबई-पुण्याच्या, तसेच आजूबाजूच्या प्रमुख शहरातील नागरिकांचे सुटीच्या दिवशी मावळातील या दुर्गम भागात वावर वाढला असून, गावातील अनेक तरुण पैशांसाठी त्यांना साथ देऊन वन्यसृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहेत. याचप्रमाणे शहरातील नागरिकांच्या दारूच्या आमिषाला बळी पडत आहेत. या वाढत्या शिकारींमुळे दुर्गम गावांमधील तरुणवर्ग नशेच्या आहारी जाऊ लागला असून, फुकटात मिळणाऱ्या मद्यासाठी मुक्या प्राण्यांचे बळी घेऊ लागला आहे. अशा शिकारी बंदूकधाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी, त्याचप्रमाणे स्थानिकांच्या वृक्षतोड, बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मावळातील निसर्गसृष्टी वाचवा, वन्यप्राणी वाचवा हा नारा अनेक प्राणिमित्र संघटना, पर्यावरणप्रेमी व नागरिक देत आहेत.

टॅग्स :mavalमावळforest departmentवनविभागpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड