शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

दीडशे जणांवरच भार

By admin | Updated: December 29, 2014 01:11 IST

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आगीच्या घटनाही वाढत आहेत

पिंपरी : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आगीच्या घटनाही वाढत आहेत. अशातच ७५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. फक्त १५० कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचे कामकाज सुरू आहे. आपत्कालीन समस्येतून मार्ग काढणारा महत्वाचा विभाग म्हणजे अग्निशमन दलाकडे पाहिले जाते. मात्र, याच विभागात १९८५ पासून जागा भरल्या नाहीत. कर्मचाऱ्यांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अग्निशमन दलाकडून ३५ कोटीचे उत्पन्न पालिकेला मिळत असतानाही प्रशासनाकडून या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. शहराचा विस्तार होत असताना अग्निशमन दलाचाही ताण वाढत चालला आहे. आळंदी, तळेगाव, जुन्नर या ठिकाणी अग्निशमनाच्या गाड्या उपलब्ध असतानाही पिंपरी-चिंचवड विभागातून गाड्या बोलवल्या जातात. यामुळे कामावरचा ताण वाढलेला दिसून येत आहे. शहरात एकूण भोसरी, रहाटणी, प्राधिकरण व पिंपरी अशी चार केंद्र आहेत. शहरातील शासकीय इमारती, दवाखाने, शाळा सर्व ठिकाणी अग्निशामक दलाने विहीत मानांकाप्रमाणे आग विझवण्याची यंत्रणा कार्यरत केलेली आहे. मात्र खासगी शाळा, दवाखाने अथवा इमारती या ठिकाणीही अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी बिल्डर अथवा सोसायटीची आहे. अग्निशमन दलाच्या वतीने खासगी ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम नाममात्र शुल्क दरात दिले जाते. अशा ठिकाणी परवानाधारक एजन्सीकडून ही अग्निशमण यंत्रणेची तपासणी केली जाते. मात्र, रहिवासी इमारतीना अग्निशामक यंत्रणा वापरताना दिसून येत नाही. जिवित व वित्त हानी वाचविणे, आपत्कालीन व्यवस्थापन व अग्निशामनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे ही अग्निशमन विभागाची कामे असतात. पायाभूत सोईसुविधा, तसेच अग्निशमन दलाकडे वाहनसंख्याही अपुरी आहे. अग्निशमन विभागाकडे सध्या आग विझवण्यासाठी १० वाहने आहेत, मात्र ही यंत्रणा अपुरी पडत आहे. अग्निशमन वाहनांची संख्या दुपटीने वाढविणे गरजेचे आहे. अग्निशामन अधिकारी, मुख्य अधिकारी ही पदे भरणे गरजेचेआहे. फायरमनची पदे सध्या ९५ आहेत. आणखी २५० जागांची आवश्यकता आहे. आगीच्या घटनाबरोबरच झाडे पडणे, इमारती कोसळणे, गॅस लिकेज, प्राणी संकटात सापडणे आदी घटनांतही अग्निशमनदलाला धाव घ्यावीलागत आहे. आपत्कालीन संकटाचा सामना करत असताना मात्र अग्निशमन दलाकडेच पालिके चे दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)