शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो पोती कांदा फेकला जातो, तर शेकडो एकर पेरलाही जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:24 IST

कांद्याचा वांदा; कमी कालावधीत भरपूर केली होती लागवड

खोडद : यंदा दुष्काळाचा दाहकतेत टिकून राहणारे पीक म्हणून आणि कमी कालावधीत येणारे नगदी पीक म्हणून जुन्नर तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर दुसरीकडे, मागील हंगामातील कांदाच अद्याप मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. मात्र, त्या कांद्याना साठवून ठेवल्याने मोड आल्यामुळे शेकडो पोती कांदा अक्षरश: फेकून द्यावा लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत, पैसा वाया गेला असून येणाºया कांद्याला तरी किमान भाव मिळेल की नाही, याची चिंता शेतकºयांना सतावत आहे.मागील वर्षभर कांद्याला चांगला बाजारभाव नसल्याने साठवणूक चाळींमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. यंदा तरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने शेतकºयांनी कांद्याची विक्रीदेखील केली नव्हती. मात्र, सध्याच्या विषम हवामानातमुळे त्या साठविलेल्या कांद्याला मोड फुटत असल्याने अनेक शेतकºयांनी हा कांदा अक्षरश: फेकून दिला आहे. मोड आलेला कांदा ना व्यापारी घ्यायला तयार आहेत, ना चाळीत व्यापारी साठवून ठेवायला तयार आहेत. त्यामुळे शेतकºयांना पर्यायच राहिलेला नाही.मिागील वर्षी कांद्याला बाजारभाव मिळाला नसतानाही चालू कांद्याची लागवड केली आहे.भाजीपाला आणि फळपिकांवर सध्याच्या विषम हवामानामुळे विपरित परिणाम होत आहे. पिकांची वाढ खुंटली, तर मावा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. विषम हवामान आणि तापमान यामुळे पिकांच्या मुळांची वाढ मंदावली आहे. सध्याच्या वातावरणामुळे शेतकºयांना बुरशीनाशकांची वारंवार फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.थंडीमुळे पात वाढते व गाठ कमी होतेचालू वर्षी कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्र गाराठला असून, या थंडीचा तसेच विषम हवामानाचा परिणाम शेतपिकांवरही मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. सध्या रब्बी पिकांना ही थंडी पोषक ठरत असून, गहू, हरभरा, कांदा या पिकांची जोरदार वाढ होत आहे. विशेषत: कांदापिकाच्या बाबतीत शाखीय वाढ (कांदापात) जास्त होऊन कांदागाठीची वाढ कमी होत आहे. यामुळे दर्जात्मकदृष्ट्या हा कांदा कमी टिकाऊ असेल.नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकांमध्ये रस शोषणाºया किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. सकाळी शेताच्या बांधावर धूर करून तापमान वाढविण्याचा प्रयत्न करावा. फळबागांमध्ये या तंत्राचा चांगला लाभ होतो. सध्या मावा या प्रमुख किडीचा तसेच डावणी आणि भुरीसारख्या रोगांचा द्राक्षपिकावरही परिणाम होऊ शकतो. काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकणे, साखर उतारा कमी मिळणे अशा अडचणी उद्भवू शकतात. डाळिंबबागांवरही मावा व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचेही नियंत्रण करणे गरजेचे आहे.- प्रा. राधाकृष्ण गायकवाडप्राचार्य, कृषी तंत्रनिकेतन, नारायणगाव 

टॅग्स :onionकांदाJunnarजुन्नरFarmerशेतकरी