शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

हास्ययोगाद्वारे आलेले हास्य हदयातून येते : मुक्ता टिळक; पुण्यात ‘हास्ययोग’चा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:33 IST

पुणेकरांना या हास्याचा अनुभव देण्याचे काम हास्ययोग परिवार देत आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हास्ययोग आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते ‘हास्यवार्ता’ विशेषांकाचे प्रकाशन पुणे हे गंभीर चेहऱ्याचे शहर, या शहराला विठ्ठल काटे यांनी हसरा चेहरा दिला : शां. ब. मुजूमदार

पुणे : हास्ययोगाद्वारे आलेले हास्य हे कृत्रिम नसून, ते हृदयातून येते अशा हास्याने आपल्या शरीराची आणि मनाची खूप चांगली जोपासना होते. पुणेकरांना या हास्याचा अनुभव देण्याचे काम हास्ययोग परिवार देत आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.पुणेकरांच्या दिनक्रमात आरोग्यदायी हास्ययोग आणणाऱ्या, विठ्ठल काटे व सुमन काटे यांनी सुरू केलेल्या हास्यक्लब चळवळीला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हास्ययोग आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार, उल्हास पवार, पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. संजय उपाध्ये, प्रकाश धोका, डॉ. रमेश गोडबोले, डॉ. मधूसुदन झंवर, डॉ. सुभाष देसाई, डॉ. सतीश देसाई, विकास रूणवाल, विनोद शहा, विजयराव भोसले (उपाध्यक्ष, नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था), सचिव पोपटलाल शिंगवी (नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था), खजिनदार रामानुजदास मिणियार (नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था), समन्वयक मकरंद टिल्लू (नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था)आदी उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘हास्यवार्ता’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुणपिढी देखील या हास्ययोगामध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरत आहेत, याचा जास्त आनंद वाटतो, असे देखील टिळक म्हणाल्या.हास्ययोग क्षेत्रातील योगदानाच्या द्विदशकपूर्तीनिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेचे संस्थापक विठ्ठल काटे आणि सुमन काटे यांचा कार्यगौरव सोहळा देखील पार पडला. मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल देऊन  काटे यांचा सन्मान करण्यात आला.डॉ. शां. ब. मुजूमदार म्हणाले, विठ्ठल काटे हे खऱ्या अर्थाने ’हास्ययोगाचार्य’ आहेत. मी गेली ५५ वर्षे पुण्यात आहे, परंतु मी इतका हसविणारा कार्यक्रम पाहिला नाही. हसणे आणि हसविणे या दोन्ही गोष्टी अनुभवयाला मिळाल्या. पुणे हे गंभीर चेहऱ्याचे शहर म्हटले जाते. या गंभीर चेहऱ्याच्या शहराला विठ्ठल काटे यांनी हसरा चेहरा दिला आहे. हसणे हा योग आहे, एक औषधं आहे हे या हास्ययोग परिवाराने खरे केले आहे. सत्काराला उत्तर देताना काटे म्हणाले, आपण या परिवाराद्वारे एक सशक्त भारत तयार करीत आहोत. राष्ट्रीय एकात्मता खूप मोठी आहे. भारत विविध जाती-धर्माचा देश आहे, या सर्वांना एकत्र बांधून एकत्र घेऊन सुसंवाद साधणे गरजेचे आहे. या करिता हास्ययोग परिवार अधिकाधिक वाढविणे आवश्यक आहे.

टॅग्स :Mukta Tilakमुक्ता टिळकS B Mujumdarशां. ब. मुजुमदारPuneपुणे