पुणे : पुण्यामधील चौफुला गावातील एका गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्यात आला आहे. या कृत्रिम पायाच्या मदतीने लवकरच ही गाय ल चार पायांवर चालू शकणार आहे. अपंग गायीवर शस्त्रक्रिया करून २ ऑगस्ट रोजी हा कृत्रिम पाय बसवण्यात आला. गायीला तीनच पाय होते. गावकऱ्यांनी तिला संचेती रूग्णालयातील प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स विभागातील डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्याचे आव्हान स्विकारले आणि सर्व उपचार मोफत देण्यात आले.
संचेती रुग्णालयाच्या प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स विभागाचे प्रमुख डॉ. सलिल जैन म्हणाले, 'कृत्रिम पाय तयार करण्यासाठी आम्ही त्या पायाचे माप दोन आठवड्यांपूर्वीच घेतले. माझ्या टीमने गायीच्या शरीररचनेचा अभ्यास केला आणि त्यानंतर कृत्रिम पायाची रचना तयार केली. वजनदार प्राण्यांच्या अवयवांची रचना करणे अवघड असते. कृत्रिम पाय लावल्यावर ही गाय आता उभी राहण्यास सक्षम असून ती हळूहळू चालू शकत आहे. परंतु, कृत्रिम पायाशी जुळवून घेण्यासाठी तिला जवळपास एका महिन्याचा कालावधी लागेल. आम्ही तिच्या पायाच्या हालचालींवर आणि त्यामध्ये होणाऱ्या प्रगतीवर लक्ष ठेवत आहोत. गावकरी अमर जगताप ज्यांनी या गायीच्या कृत्रिम पायाच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला.
- डॉ. पराग संचेती, संचेती इंस्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडीक आणि रिहॅबिलीटेशनचे प्रमुख-------प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी रूग्णालयाच्या या कामगिरीचं कौतुक केले आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, प्राण्यांसाठीच्या कृत्रिम गोष्टी तयार करण्यासाठी अधिकाधिक संशोधन केले पाहिजे. पेटा इंडियाचे सीईओ मणिलाल वल्लीयाते म्हणाले, 'वजनदार प्राण्यांसाठीच्या कृत्रिम पायाची प्रक्रिया आव्हानात्मक असते. यामध्ये वजनाचा योग्य प्रमाणात समतोल राखण्याबाबत खबरदारी घेतली पाहिजे.जनावरांसाठी देशात असे आणखी उपक्रम आवश्यक आहेत.