शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मानवतावादाचे विचार देशाला तारू शकतील - लक्ष्मीकांत देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:33 IST

मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

सोमेश्वरनगर - मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.सोमेश्वरनगर येथील साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने बारामती येथे रविवारी (दि. २३) काव्यसागर या राज्यस्तरीय कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप अध्यक्षस्थानी होते. या वेळी तहसीलदार हनुमंत पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, शैलेश रासकर, उद्योजक राजेंद्र जगताप, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, महसूल विभागाचे निवृत्त उपायुक्त शिवाजी राजेनिंबाळकर, डॉ. जया कदम, संभाजी गायकवाड यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले साहित्यिक व कवी उपस्थित होते.देशमुख म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद आणि सेक्युलरवाद ही सूत्रे समाजामध्ये अवलंबून आपल्याला वाटचाल करायची आहे. जात, धर्म विरहित माणूस घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी नवोदित कलावंतांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’सोमेश्वरचे अध्यक्ष जगताप यांच्यासह चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. राज्याच्या विविध भागांतील साहित्यिक आणि कवींना या वेळी कृतज्ञता सन्मान, राज्यस्तरीय साहित्यरत्न आणि जीवनगौरव साधना पुरस्कार देऊन गौरविले. साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा. हनुमंत माने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रकाश गायकवाड यांनी संयोजन केले.संस्कृती आणि साहित्य वाचणाराच देश मोठासत्य, शिव आणि सुंदर विचार केल्यानेच माणसाची वाटचाल पशुसंस्कृती ते देवसंस्कृती अशी झाली आहे. आदर्श असणाऱ्या ‘रामायण’ या महाकाव्यातून बोध घेण्याची गरज आहे. साहित्य, कला, संगीत, क्रीडा या क्षेत्रांत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे आहे. संस्कृती आणि साहित्य वाचणाराच देश मोठा असतो, असे देशमुख म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे