शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकाल २०१८: ११ वर्षांपूर्वी दहावीत फेल, यावर्षी बारावीत बाजी... रात्रशाळेतील तरुण डिस्टिंक्शनने उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:02 IST

त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली असून पत्नीने खूप मदत केल्याचे ते आवर्जून सांगतात.

पुणे : कोण दुकानात काम करत तर कोणी डिलिव्हरी बॉय म्हणून... पण प्रत्येकातला समान धागा म्हणजे शिक्षणाची ओढ.पुण्यातल्या पूना नाईट हायस्कुल संस्थेचा बारावीचा निकाल 86 टक्के लागला आहे.या शाळेजवळच असणाऱ्या  तुळशीबागेतील कॉस्मेटिकच्या दुकानात काम करून आकाश धिंडले याने 79 टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला. आकाश हा वेल्हे तालुक्यातील घिसरगावचा रहिवाशी आहे. दहावीत 81 टक्के गुण मिळवल्यानंतर त्याने पुण्यातील पुना नाईट हायस्कुल येथे प्रवेश घेतला आणि कॉस्मेटीकच्या दुकानात काम करून अभ्यास करत या रात्रशाळेत प्रथम येण्याचा पराक्रम केला.दिवसभर दुकानात काम करून तो संध्याकाळी 6.30 वाजता शाळेत जात असे.घिसरगावात त्याचे आई वडील उदरनिर्वाहासाठी  शेती करतात.त्याला पुढे सीएस करण्याची ईच्छा आहे.आयुष्यात पुढे जायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही असे त्याला वाटते.त्याकरिता पुढेही कामासोबत शिक्षण सुरू ठेवण्याचा त्याचा निर्धार आहे.

याच शाळेत 75.23 टक्के मिळवत विठ्ठल बसवेश्वर ईश्वरकट्टी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. 10वीत एका विषयात नापास झाल्यावर सुमारे 11 वर्ष त्यांचा शिक्षणाशी संबंध तुटला होता. लहान बहिणीच्या प्रेरणेने त्यांनी पुन्हा शिक्षणाला प्रारंभ केला. ते सर्जिकल स्टोअरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. यादरम्यान 2015 मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यामुळे विठ्ठल ईश्वरकट्टी यांचा हुरूप आणखी वाढला आणि ते बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली असून पत्नीने खूप मदत केल्याचे ते आवर्जून सांगतात.

पुना नाईट हायस्कुलचे प्राचार्य अविनाश ताकवले म्हणाले, यावर्षी आमच्या रात्रशाळेत 120 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यातील 104 विद्यार्थी पास झाले आहेत.यावर्षी आतापर्यंतचा सर्वोच्च 86 टक्के निकाल लागला आहे.सर्वसाधारण शाळेपेक्षा रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे शेड्युल्ड वेगळे असते. आपल्याला शिक्षण घ्यायचे आणि कुटूंबाला हातभार लावायचा या हेतूने हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले असतात. 

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षाeducationशैक्षणिक