जुन्नर तालुक्यात किती बिबटे ? वन खात्याला माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 02:24 AM2019-09-13T02:24:19+5:302019-09-13T02:24:36+5:30

साधारणपणे २५ ते ३० वर्षांपूर्वी वाघ, बिबट्या, लांडगे, तरस ही जंगली श्वापदं गावालगत येत असत;

How many bibtes are in Junnar taluka? The forest department does not know | जुन्नर तालुक्यात किती बिबटे ? वन खात्याला माहितीच नाही

जुन्नर तालुक्यात किती बिबटे ? वन खात्याला माहितीच नाही

Next

राजुरी : जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले असून तालुक्यात किती बिबटे आहेत, याचा अंदाज खुद्द वन खात्याला माहिती नाही. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साधारणपणे २५ ते ३० वर्षांपूर्वी वाघ, बिबट्या, लांडगे, तरस ही जंगली श्वापदं गावालगत येत असत; परंतु त्यांचा वावर हा शक्यतो डोंगरात असणाऱ्या गुहा, कपारी यांमध्ये असे. बिबट्या हा एक मांजरवर्गीय प्राणी, अतिशय चपळ, जवळजवळ ४० किलोमीटर परिघामध्ये आपले साम्राज्य वसवतो. काळ बदलला जमिनीचे भाव गगनाला भिडले; त्यामुळे वृक्षतोड वाढली, परिणामी जंगलक्षेत्र कमी होऊ लागले, जंगलांना लागलेले की लावलेले वणवे या व इतर कमी-अधिक समस्यांमुळे जंगलातील श्वापदांना जंगलात मिळणारी शिकार कमी झाली. जुन्नर तालुक्यातील येडगाव, पिंपळगावजोगा, वडज, माणिकडोह, चिल्हेवाडी या जुन्नर तालुक्याला वरदान ठरणारी पाचही धरणे आणि कालव्यांचे जाळे यामुळे जमिनी चांगल्यापैकी ओलिताखाली आल्या व तालुक्यातील एक व शेजारील तालुक्यातील साखर कारखानदारीमुळे शेतकरी कमी श्रमाच्या ऊसशेतीकडे वळला व सैरभैर झालेल्या बिबट्यांना मानवनिर्मित वस्तीस्थान तयार झाले आणि त्यांचा मानवी वसाहतीजवळचा वावर वाढू लागला आणि याच ठिकाणी संघर्षाची ठिणगी पडली. ऊसशेतीजवळ असणाºया पाळीव जनावरांवर बिबट्याचा उदरनिर्वाह होऊ लागला, परंतु येथेही पाळीव जनावरे बंदिस्त होऊ लागल्याने बिबट्याच्या नजरेत बसू लागला, दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकू लागली, आज काय तर माणसांवर हल्ला, तर उद्या पाळीव प्राण्यांवर हल्ला, आजकाल तर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत, अशा बातम्या वर्तमानपत्रात ठळक ठसठशीत येऊ लागल्या.

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गोलेगाव-पिंपळगाव परिसरात बिबट्याच्या दर्शनाने घबराटीचे वातावरणात पसरले आहे. विशेष म्हणजे, रविवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी उसाच्या शेतालगत बिनधास्त विहार करणारा बिबट्या पाहिल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. साबळेवाडी, कोयाळी भानोबाची, मरकळ, मोहितेवाडी, बंगलावस्ती, दौंडकरवाडी, रामनगर, साबळेवस्ती, चिंचोशी आदी ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे. दौंडकरवाडी, पोतलेमळा, कोयाळी-भानोबाची गावात पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून जनावरे, तसेच पाळीव कुत्री फस्त केली आहेत.

Web Title: How many bibtes are in Junnar taluka? The forest department does not know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.