शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसेंना क्लीन चीट कशी? : अंजली दमानिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:16 IST

कुटुंबियांना कवडीमोल किंमतीत जमीन मिळवून दिल्याप्रकरणी खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी त्यांना निर्दोष ठरविल्याच्या विरोधात माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांना

ठळक मुद्दे न्यायालयात दाखल केला हस्तक्षेप अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच या जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला

पुणे : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निर्दोष ठरविल्याच्या विरोधात माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली. सर्व पुरावे देऊनही अरोपीला निर्दोष सोडण्यात आल्याचा हस्तक्षेप अर्ज त्यांनी सोमवारी न्यायालयात दाखल केला. त्यावर फिर्यादी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एच. महम्मद यांनी नोटीस बजावली असून, त्यावर येत्या ५ जून रोजी सुनावणी होणार आहे. आपल्या अधिकाराचा वापर करत कुटुंबियांना कवडीमोल किंमतीत जमीन मिळवून दिल्याप्रकरणी खडसे यांना जून २०१६मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भोसरी एमआयडीसीतील सुमारे ३१ कोटी रुपये किंमतीची जमीन पावणेचार कोटी रुपयांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक हेमंत गवांडे यांनी फिर्याद दिली होती. शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात दावा सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच या जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.  याचिकाकर्त्या दमानिया म्हणाल्या, माझा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचा दावा खडसेंकडून करण्यात आला आहे. पत्नी आणि जावयाने जमीन घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या व्यवहारासाठी पैसे कसे आले त्याची सर्व माहिती मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यापूर्वीच दिली आहे. खडसेंच्या खात्यातूनच त्यांच्या पत्नीच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे दिसून येत आहे. पत्नीच्या त्यात खात्यातील पैशातून जमिनीचा व्यवहार आणि मुद्रांक शुल्कची रक्कम भरल्याचे दिसून येत आहे. त्याची सर्व कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली असताना त्यांनी खडसेंना कशाच्या आधारे निर्दोष ठरविले. याबाबत आमचे म्हणणे ऐकून घेतल्या शिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. न्यायालयाकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि फिर्यादींना नोटीस काढण्यात येईल. भ्रष्टाचार हा नागरिकांशी केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार लोकप्रतिनिधींनी केलेला भ्रष्टाचार गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालाची प्रत मिळावी आणि दमानिया यांचे म्हणणे ऐकून घ्यावे असे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी न्यायालयाला सांगितले. 

टॅग्स :bhosariभोसरीEknath Khadaseएकनाथ खडसेanjali damaniaअंजली दमानियाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग