पांडुरंग मरगजेपुणे (धनकवडी) : चूल आणि मूल या नियमांची चौकट मोडून राज्यातील लाखो महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत समाजात आत्मसन्मान मिळाला आहे. या महिला समाजातील अन्य महिलांसाठी पथदर्शी ठरत आहेत. यामधीलच एक नाव निता मेहता.एक गृहिणी ते नँशनल चँम्पियनशिप आणि २०२० च्या विश्वस्तरीय स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व हा प्रवास सर्वसामान्य गृहिणींना निश्चितच प्रेरणादायी आहे. खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चिकाटी, दृढनिश्चय आणि सातत्याने केलेल्या सरावाच्या जोरावर निता मेहता यांनी कझाकिस्तान येथे झालेल्या एशियन गेम्स् वुमन्स पाँवरलिफ्टींग चँम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करीत २०२० मध्ये होणाऱ्या विश्वस्तरीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे. निता या पुण्यातील सारसबाग परिसरात राहात असून, सातारा रस्ता परिसरातील नामांकित संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. . निता यांनी वयाच्या तिशीनंतर उत्तम आरोग्यासाठी दृढनिश्चय करून व्यायामाला सुरुवात केली. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतः चे आरोग्य उत्तम असावे म्हणून फावल्या वेळात त्या व्यायाम करु लागल्या. मात्र अगदी कमी कालावधीमध्येच त्यांच्या मधील स्पिरिट आणि कौशल्य प्रशिक्षक ओंकार नेलेकर यांनी हेरले आणि निता यांनी पाँवरलिफ्टींगमध्ये करिअर म्हणून सराव करण्याचा सल्ला दिला.
गृहिणी ते नॅशनल चॅम्पियन ; तिचा थक्क करणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:24 IST