शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुणेकरांनो, घरगुती सुका कचरा आता दिवसाआड जमा केला जाणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:11 IST

कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दंडही भरावा लागणार

ठळक मुद्देघरगुती ओला कचरा मात्र दररोज उचलण्यात येणार कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण सवय नागरिकांना लागावी हा हेतू

पुणे : घरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण देऊन तो कचरा वेचकांकडे सुपूर्त करण्याची सवय नागरिकांना लागावी. या उद्देशाने पुणे महापालिकेने सोमवारपासून घरगुती सुका कचरा एका दिवसाआड गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान घरगुती ओला कचरा मात्र दररोज उचलण्यात येणार आहे.    महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना आता सुका कचरा दोन दिवस घरातच ठेवावा लागणार असून, कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दंडही भरावा लागणार आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा, यासाठी ओला कचरा दररोज तर सुका कचरा दिवसाआड उचलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. यापुढे ओला व सुका कचरा वेगळा न करता मिश्र कचरा देणाऱ्या नागरिकांना पहिल्या वेळी ६० रुपये, दुसऱ्या वेळी १२० रुपये व त्या पुढील प्रत्येक वेळेस १८० रुपये दंड आकारण्यात येणार असून, त्या अनुंगाने वॉर्ड ऑफिस स्तरावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार नागरिकांनी घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला, सुका व जैविक कचरा वेगळा करून देणे बंधनकारक आहे. मात्र, वारंवार सूचना करून नागरिक हा सर्व कचरा एकत्रच देतात़ परिणामी हा सर्व कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यामुळे  घरगुती कचऱ्याचे घरातच वर्गीकरण व्हावे, या हेतूने महापालिकेने ओला कचरा दररोज, तर सुका कचरा एक दिवसाआड संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, वॉर्ड ऑफिसनिहाय कचरा संकलनाचे वेळापत्रक तयार केले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख माधव जगताप यांनी दिली......मोठया सोसायट्यांना आठ दिवसांची मुदत     शहरात दररोज शंभर किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, तसेच पन्नास पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्था, रूग्णालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, हॉटेल्स-रेस्टॉरन्ट यांनी ओला कचरा आपल्याच परिसरात प्रक्रिया करून जिरविणे बंधनकारक आहे. मात्र अद्यापही अनेक आस्थापनांनी याबाबत कार्यवाही केलेली नाही किंवा प्रक्रिया प्रकल्पही उभारलेले नाहीत. त्यामुळे अशा सर्व आस्थापनांना महापालिकेने पुढील आठ दिवसात प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सूचना केली असून, त्यानंतर तेथील ओला कचरा उचलण्यात येणार नसल्याचेही सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका