पुणे : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने घरातही उकाडा असह्य होऊ लागला आहे. कूलर, एसी, फॅनचा वापर करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. भारनियमनामुळे अचानक लाईट गेले तर काय करणार? शिवाय, विजेचे वाढते बिलही काळजाचा ठोका चुकवते. यावर पर्याय म्हणून एका पुणेकर अवलियाने घराचे तापमान कमी करण्यासाठी अनोखी क्लृप्ती शोधून काढली आहे.अचानक लाईट गेले तर काय करणार? शिवाय, विजेचे वाढते बिलही काळजाचा ठोका चुकवते. यावर पर्याय म्हणून एका पुणेकर अवलियाने घराचे तापमान कमी करण्यासाठी अनोखी क्लृप्ती शोधून काढली आहे.एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो. यावर उपाय म्हणून कोथरुडमधील उमेश दारवटकर यांनी टाकाऊ वस्तूंपासून घरात गारवा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.जुनी वापरलेली पोती, इतरांनी वापरुन फेकून दिलेले थर्माकोलचे शीठ आणि ठिबक सिंचनाचा वापर करुन दारवटकर यांनी घराचे वातावरण ४-५ अंश सेल्सियशने कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरचे वातावरण अंशाअंशाने वाढत असताना, घरातील तापमान १९-२० अंश सेल्सियश कमी करण्यात यश आले आहे.दारवटकर यांनी मार्केट यार्डमधून कमी दराने मिळणारी पोती विकत घेतली. ही पोती त्यांनी एकमेकांना शिवून भिंतीवर आणि टेरेसवर लावली आहेत. थर्माकोलच्या शीटमधून रबरी नळीच्या सहाय्याने पाणी पोत्यांवर पडत राहते. त्यामुळे पोती आणि पर्यायाने भिंती कायम थंड राहतात. त्याचाच परिणाम म्हणून घरात कायम गारवा राखून ठेवण्यास मदत मिळते.
टाकाऊ वस्तूंपासून घराला गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:26 IST
एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो.
टाकाऊ वस्तूंपासून घराला गारवा
ठळक मुद्देटाकाऊ वस्तूंपासून घरात गारवा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न