येरवडा येथील जयजवान नगर इंद्रप्रस्थ उद्यानाशेजारी हॉट मिक्स प्लांट आहे. याच परिसरात शेजारी डॉ. आंबेडकर महाविद्यालय तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आजूबाजूच्या परिसरात म्हाडाच्या विविध सोसायट्यांसोबतच अशोकनगर, माणिकनगर, लक्ष्मीनगर, कामराजनगर, जयजवाननगर या वस्त्या आहेत.
शासनाच्या नियमाप्रमाणे लोकवस्तीत अशाप्रकारे हॉट मिक्स प्लांट उभा करणे नियमबाह्य आहे. महापालिका राज्य शासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सदरचा जीवघेणा प्लांट हलवण्याबाबत स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक संतोष आरडे यांनी विविध तक्रारी दाखल केलेल्या आहेत. उपाययोजन झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आलेला आहे.
प्रतिक्रिया - प्लांट सुरू झाला त्या वेळी आजूबाजूच्या परिसरात वस्ती नव्हती. मात्र सद्य:परिस्थितीत प्लांटमधून निघणारा धूर हा थेट लोकवस्तीमध्ये जात आहे. त्यामुळे या धोकादायक धुरामुळे नागरिकांना नक्कीच त्रास होऊ शकतो.
डॉ. सुभाष कोकणे.
फोटो ओळ - येरवडा येथील हॉट मिक्स प्लांटच्या धुरामुळे नागरिक त्रस्त आहेत.