शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

घोडेस्वारीचा थरारक अनुभव; पुण्यातील रेसकोर्स येथे राष्ट्रीय घोडेस्वारी अजिंक्यपद स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:01 IST

रेसकोर्स येथे चार दिवस ‘राष्ट्रीय घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धा’ होत आहे. या वेळी साउथर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देरेसकोर्स येथे चार दिवस ‘राष्ट्रीय घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धा’ पहिल्या दिवशीच्या संघाच्या गटात नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीला (एनडीए) सुवर्णपदक

पुणे : धावणाऱ्या घोड्यावरून तिरंगा फडकाविल्यानंतर उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला आणि या तिरंग्याला घोड्यावर उभे राहून  दिलेली सलामी उपस्थितांची मने जिंकणारी होती. हा अप्रतिम मनमोहक, शिस्तबद्ध सोहळा अनुभवण्याची संधी गुरुवारी मिळाली. निमित्त होते साउथर्न स्टार हॉर्स २०१७ चे. रेसकोर्स येथे चार दिवस ‘राष्ट्रीय घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धा’ होत आहे. या वेळी साउथर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सदर्न कमांडचे अधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. स्पर्धेत देशभरातील शंभर घोडस्वारांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा १९ नोव्हेंबरपर्यंत रेसकोर्स येथे चालणार आहे. स्पर्धेत देशभरातील अनेक घोडेस्वार सहभागी झाले असून, यामध्ये मुलींचाही सहभाग आहे. स्पर्धेत अकरा अडथळ्यांचा समावेश आहे. घोडेस्वाराला कोणतीही चूक न करता हे अडथळा पूर्ण करायचे आहेत. आज झालेल्या स्पर्धेत बहुतांश स्पर्धकांनी दोन चुका केल्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. अनेकदा अडथळा पार करताना घोड्याने मनाई केली. तेव्हा अनेक घोडेस्वारांनी पुन्हा त्या घोड्यामध्ये व स्वत:मध्येही आत्मविश्वास जागवून अडथळा पार करून उपस्थितांची मने जिंकली.

 

एनडीएला सुवर्णपदक पहिल्या दिवशीच्या संघाच्या गटात नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीला (एनडीए) सुवर्णपदक मिळाले, तर संदीप शेप याने एकल गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या शो जंपिंगमध्ये ओसामा जेथवॉलने सुवर्णपदक मिळविले. नोव्हाईस शो जंपिंगमध्ये पी. जे. सपकाळ विजेते ठरले. 

टॅग्स :Puneपुणे