शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात हायवेवर भीषण अपघात; अग्निशमन दलाकडून रिक्षाचालकाची थरारक सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:20 IST

Pune Accident News: अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतुकीस धोका होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या.

पुण्यात बावधन कडून वारजेकडे जाणाऱ्या हायवेवर वेद विहार समोर रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. MH 12 QR 4621 या क्रमांकाच्या रिक्षाचा रस्त्याच्या डीवायडरवर अपघात झाला आणि रिक्षाचालक रिक्षामध्ये अडकून पडला होता. घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आणि अग्निशमन विभागाच्या टीमने अत्यंत शिताफीने बचावकार्य पार पाडले.

अपघातग्रस्त रिक्षामध्ये अडकलेले रिक्षाचालक गणेश कोळसकर (वय ३५) यांची सुटका करण्यासाठी वारजे फायर ब्रिगेड, NDA अग्निशमन केंद्राची फायर गाडी, आणि रिस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. दलाच्या जवानांनी स्प्रेडर कटर च्या सहाय्याने अडकलेल्या चालकाचे दोन्ही पाय मोकळे करत त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर तातडीने अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

दरम्यान, अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतुकीस धोका होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. या बचावकार्यात अग्निशमन अधिकारी सुनिल नामे यांच्या नेतृत्वाखालील टीमने कामगिरी बजावली. टीममध्ये फायरमन विजय स्वामी, बाळू तळपे, आशिष सुतार, कोंडीबा झोरे, भंडारी, जांभळे, तसेच ड्रायव्हर गोडसे, कल शेट्टी आणि चौरे यांचा सहभाग होता

टॅग्स :Accidentअपघात