शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या कैैद्यांना सुटकेची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:21 IST

सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार : खितपत पडलेल्या ५ जणांना मोकळी हवा

पुणे : न्यायालयाने जामीन मंजूर केलाय, निर्दोष मुक्तताही झालीय; पण न्यायालयीन कामकाजाची पूर्तता करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ ७ हजार रुपये नाहीत. असे अनेक कच्चे कैदी कारागृहात खितपत पडले होते. नातेवाईक किंवा मित्रही मदतीसाठी पुढे येत नव्हते. या बंद्यांसाठी रॉयल ग्रूप आशेचा किरण बनून आला आहे. त्यांच्या मदतीने आतापर्यंत अशा ५ कैद्यांची सुटका झाली असून, आणखी १० जणांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू आहे़एखाद्या गुन्ह्यात एकाला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी पूर्ण झाल्यावर त्याची न्यायालयीन कोठडीत तुरुंगात रवानगी होते़ किरकोळ गुन्हे असतील, तर अशा कैद्यांना जामिनावर सोडावे, अशा उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत़ कारागृहातील कच्च्या कैद्यांची संख्या वाढल्याने याबाबत न्यायालयानेही चिंता व्यक्त केली होती़ अशा कैद्यांची सुटका व्हावी, यासाठी आता स्वयंसेवी संस्था पुढे आली आहे़रॉयल ग्रुप आॅफ कंपनीचे प्रफुल्ल कोठारी यांनी सांगितले, की कारागृह विभागाचे प्रमुख भूषणकुमार उपाध्याय यांची एकदा भेट घेतली. त्यांनी, ज्यांचा जामीन झाला; परंतु न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अजूनही कारागृहात खिचपत पडले आहेत अशा कच्च्या कैद्यांना मदतीसाठी एखादी स्वयंसेवी संस्था शोधत असल्याचे सांगितले़ आमची संस्था याबाबत पुढाकार घेईल, असे सांगून हे काम हाती घेतले़ त्यांनी ज्यांचा जामीन झाला आहे, अशा ५० कच्च्या कैद्यांची यादीच दिली़ सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मदतीने पाठपुरावा सुरू केला़ न्यायालयीन बाजू पूर्ण करण्यासाठी चार वकिलांची नेमणूक केली़ त्यातूनच ४ फेब्रुवारीला या कामाला सुरुवात झाली़ राजेंद्र सुनसुने याला अवैध दारू बाळगल्याबद्दल २ फेब्रुवारी २०१६ रोजी कारागृहात ठेवण्यात आले होते़ तो २८ मार्च २०१८ पर्यंत कारागृहात होता. त्याच्या खटल्याचा निकाल लागला असता तर त्याला ३ ते ४ महिन्यांची शिक्षा झाली असती़ परंतु, त्याचे कोणीही नातेवाईक केवळ ७ हजार रुपये भरण्यासाठी पुढे न आल्याने तो जवळपास २ वर्षे कारागृहात होता़चोरीप्रकरणात फरासखाना पोलिसांनी अटक केलेल्या जितू शहदानपुरी याचीही नुकतीच कारागृहातून सुटका करण्यात आली़ अशाच प्रकारे दोन जणांना लोकअदालतीमध्ये सोडण्यात आले आहे़ तर, काही जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे़ परंतु, न्यायालयीन प्रक्रिया आणि त्याची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने ते कारागृहात अनेक महिने पडून होते़ अशा ५ जणांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे़जितू शहदानपुरी म्हणाले, ‘‘रॉयल ग्रुपने मदत केली नसती, तर अजून बाहेर येऊ शकलो नसतो़ ते माझ्या दृष्टीने देवासारखे धावून आले़’’राज्यभरात २१ हजार ४४८ कच्चे कै दीराज्यभरामधील कारागृहातील २१ हजार ४४८ कच्चे कैदी आहेत़ त्यातील ३ हजार ४१२ जणांना ३ वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेले आहेत़ ३ हजार ९०० कैद्यांना ३ ते ७ वर्षे शिक्षा झाली आहे़ राज्यातील ४३३ कच्चे कैदी असे आहेत, की त्यांच्या जामिनाची रक्कम ते अथवा त्यांचे नातेवाईक भरू शकत नाहीत़ त्यांच्या सुटकेसाठी कारागृह प्रशासनाकडून आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत़

टॅग्स :Crimeगुन्हा