सभापती स्वाती शेंडे, उपसभापती संजय देहाडे व माजी सभापती पुष्पा रेडके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये ३९ महिला शिक्षिका, ८ तंत्रज्ञानी, १७ विशेष कार्य करणारे व ५ अधिकारी २ कर्मचारी अशा एकूण ७१ जणांना कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून दोन टप्प्यात कार्यक्रम झाला.
यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल, वरकुटे गावचे सरपंच बापूराव शेंडे, सरचिटणीस सुनील मखरे , शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनिल वाघ, उपसभापती वसंत फलफले, माजी सभापती किरण म्हेत्रे, नितीन वाघमोडे, विलास शिंदे, सुनील शिंदे यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानचिन्ह व प्रमाणात देवून शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परिट व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रताप शिरसट, भारत ननवरे, संजय भोंग, अशोक क्षीरसागर, मैनुद्दीन मोमीन, नितीन कदम, विनय मखरे, शिवाजी शिंगाडे, दिनेश काळे, संभाजी सूर्यवंशी, महेश थंबद, संभाजी गायकवाड, राहुल कानगुडे, नाना पवार, राजेंद्र शिंदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनील वाघ यांनी प्रास्तविक केले. संतोष हेगडे यांनी सूत्रसंचलन केले. वसंत फलफले यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी संचालक भारत ननवरे, प्रताप शिरसट, संतोष हेगडे यांनी विशेष प्रयत्न केले.
फोटो ओळ : इंदापूर पंचायत समितीच्या आवारात शिक्षक समितीच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करताना.