शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

इराणी टोळीतील एकाला पाठलाग करून पकडणाऱ्या धाडसी पोलिसांचा वारज्यात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:38 IST

मंगळसूत्र चोरट्या इराणी टोळीतीळ एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडणारे वारजे पोलीस ठाण्यातील कर्मचारी नीलेश कोल्हे व रवींद्र पवार यांचा नुकताच आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देनीलेश कोल्हे व रवींद्र पवार यांचा नुकताच आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते सत्कारआरोपींविरोधात वारजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा

वारजे : मंगळसूत्र चोरट्या इराणी टोळीतीळ एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडणारे वारजे पोलीस ठाण्यातील कर्मचारी नीलेश कोल्हे व रवींद्र पवार यांचा नुकताच आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.वारजे येथील पॉप्युलर कॉलनीत राहणारी ४६ वर्षीय महिला येथील बाह्यवळण महामार्गावरील अतुलनगर जवळ प्रभात फेरी मारत असताना दुचाकीवरून पाठीमागून येणाऱ्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत नागरिकांनी लगेच नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यावर दोघे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी हजार झाले. नागरिकांकडून त्यानी चोरटे व त्यांच्या वाहनाचे वर्णन घेतले व चोरटे गेलेल्या चांदणी चौकाच्या दिशेला धाव घेतली. तोपर्यंत डुक्कर खिंडीत चोरट्यांनी अजून एका महिलेला अशाच प्रकारे लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.चांदणी चौकात मुंबईकडे जाणाऱ्या बसथांब्याजवळ अशाच प्रकारच्या सावज महिलेच्या शोधात असताना पोलीस मार्शल कोल्हे व पवार यांनी त्यांना गाठले व थंडीच्या दिवसांत पहाटे पोलिसांनीही जॅकेट व मफलर गुंडाळले असल्याने चोरट्यांना ते पोलीस असल्याची लगेच कल्पना आली नाही. मात्र, विचारणा करीत असतानाच कोल्हे यांचा पोलीस वॉकीटॉकी वाजल्याने त्यांना संशय आला व त्यांनी पोलिसांना मारहाण करून पाळण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पवार यांच्या हाताला मोठा मुकामार लागून एक जण फरार झाला. दुसरा चोरटा हसन फिरोज सय्यद ऊर्फ इराणी (रा. शिवाजीनगर) याला पकडण्यात पोलीस यशस्वी झाले व त्याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Puneपुणे