शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

पुण्याच्या शिरपेचात मानाचा  तुरा : दहा सर्वोत्कृष्ट कलात्मक इन्स्टिट्यूटमध्ये ‘एफटीआयआय’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:37 IST

एफटीआयआय ही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील संस्था आहे.

ठळक मुद्देसीईओ वर्ल्ड मॅगझिनच्या यादीत मिळविले स्थान

पुणे : चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यमाविषयींचे प्रशिक्षण देण्याबरोबरच भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दर्जेदार कलाकारांची फळी निर्माण करणारे एक ‘कलात्मक व्यासपीठ’ अशी ओळख असलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) ला सीईओ वर्ल्ड मॅगझिनच्या जगभरातील पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट कलात्मक इन्स्टिट्यूटच्या यादीत स्थान मिळाले आहे. पहिल्या दहामध्ये समाविष्ट झालेली ‘एफटीआयआय’ ही आशियातील एकमेव इन्स्टिट्यूट ठरल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामध्ये  कोलकत्त्याची सत्यजित रे टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ही २२ व्या स्थानावर आहे. सीईओ वर्ल्ड ने जगभरातील  कलात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूटची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पहिल्या चार स्थानांवर अमेरिकेतील कलात्मक संस्थांनी बाजी मारली आहे. ‘यूसी स्कूल ऑफ सिनेमँटिक आर्टस ’, ‘अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट (एएफआय), ’यूएलसीए स्कूल ऑफ थिएटर, फिल्म अँंड टेलिव्हिजन युनिव्हर्सिटी ऑफ  कँलिफोर्निया व ‘कँलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ द आर्टस’ यांचा समावेश आहे. याशिवाय पाचव्या स्थानावर ब्रिटनची ’नँशनल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूल’, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर पुन्हा अमेरिकेच्या न्यूयॉर्क फिल्म अँकँडमी आणि एनवाययू टिस्च स्कूल ऑफ द आर्टस यांना स्थान मिळाले आहे. कँनडातील ’’टोरांटो फिल्म स्कूल’ आठव्या, ऑस्ट्रेलियातील  ‘सिडनी फिल्म स्कूल’ नवव्या आणि भारतातील फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) दहाव्या स्थानावर आहे. एफटीआयआय ही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील संस्था आहे. या संस्थेने नसरुद्दीन शाह, ओम पुरी, जया बच्चन, विधु विनोद चोप्रा अनेक कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीला दिले. संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची दखल ही जगभरातील विविध महोत्सवांमध्ये घेण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर संस्थेतील विद्यार्थ्यांनी आपले नाव कोरले आहे.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोला