शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील २२ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:11 IST

महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देपुणे शहर व जिल्हा पोलीस दलातील २२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरवग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मोहंमद सुवेझ मेहबुब हक यांना 'शौर्यपदक'

पुणे : महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल २६ जानेवारी २०१७ आणि १५ आॅगस्ट २०१७ रोजी राष्ट्रपतींच्या वतीने पोलीस शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेबाबत राष्ट्रपती पोलीस पदक व पोलीस पदक १०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले होते़ या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सोमवारी प्रदान करण्यात आले़ पुणे शहर व जिल्हा पोलीस दलातील २२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक देऊन गौरविण्यात आले़ याप्रसंगी ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मोहंमद सुवेझ मेहबुब हक यांना पोलीस शौर्यपदकाने गौरविण्यात आले़ रा़ रा़ पोलीस बल विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश मेखला, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ़ जय जाधव, दौंड प्रशिक्षण केंद्र पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पुणे शहर वाहतूक शाखा सहायक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब टोके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश इंगवले, हवालदार रामचंद्र तापकीर, राजेंद्र जगताप, अशोक झोळ, महाराष्ट्र गुप्त वार्ताचे पोलीस उपनिरीक्षक वसंत गवळी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागा सहायक पोलीस उपअधिक्षक हणमंत आवळे, गुन्हे अन्वेषण शाखा सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर रणपिसे, रा. रा. पोलीस बलाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी धुरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पाटील, वसंत गवळी, जीवनकुमार कापुरे, पोपट कड, उल्हास गावकर, केशव हजारे, पोलीस हवालदार पिराजी मोहिते, त्रिंबक घरत, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस हवालदार कमलाकर जाधव उपस्थित होते.या समारंभाला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस महासंचालक सतीश माथुर, पदक अलंकरण समारंभाचे नियोजन विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह यांनी केले होते.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Suvez Haqसुवेज हकPuneपुणे