शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांनी चढवला पर्यटकांवर हल्ला; राजगड किल्ल्यावरील प्रकार, ४ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:51 IST

वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला. मधमाशांनी चावे घेतल्याने ४ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व पर्यटक मुंबईतील आहेत.

ठळक मुद्देमुंबई येथील ‘नेचर लव्हर्स’ संस्थेमार्फत राजगड किल्ल्यावर दरवर्षी साजरा केला जातो उत्सव पर्यटक शिस्तीचे पालन करत नाहीत त्यामुळे वारंवार घडत आहेत दुर्घटना

वेल्हे : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला. मधमाशांनी चावे घेतल्याने ४ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व पर्यटक मुंबईतील आहेत.स्थानिक शेतकऱ्यांनी किल्ल्यावर धाव घेतली. जखमींना झोळीतून पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात आणून पुढील उपचारासाठी करंजावणे प्राथमिक अरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी नांदेडकर जखमींवर उपचार करत आहेत.मुंबई येथील ‘नेचर लव्हर्स’ नावाच्या संस्थेमार्फत दरवर्षी २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत राजगड किल्ल्यावर मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी ही उत्साहात कार्यक्रम साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी संस्थेचे कार्यकर्ते राजगडाला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम चालू असताना ७ नंबरच्या गटामधील स्वप्निल मोहन जाधव, (वय २८) शंकर मारुती शेलार (वय २७), पुरुषोत्तम लक्ष्मण कडलसकर (वय ५८, सर्व रा. मुंबई) यांच्यावर गडाच्या पश्चिमेकडील बाजूने प्रदक्षिणा घालताना मधमाशांनी हल्ला चढविला. मधमाशांनी चावा घेतल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. तसेच विनायक पटवर्धन (वय ४५) हे इसम मधमाशांच्या हल्ल्याला घाबरुन गडाच्या कपारीतून धावत सुटले. कपारीतून ते घसरुन पडल्यामुळे जखमी झाले.

स्थानिक शेतकरी धावले मदतीलापर्यटकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक शेतकरी संतोष ढेबे, तानाजी हारपुडे, संजय रसाळ, अंकुश पडवळ, अंकुश भिलारे, विलास लिम्हण, हनुमंत दरडिगे, प्रकाश ढेबे, सुभाष शिळीमकर यांनी जखमींकडे धाव घेतली. जखमी पर्यटकांना झोळीत घालून गडाच्या पायथ्याशी आणले व वाहनातून करंजावणे अरोग्य केंद्रात पाठविले.राजगड हा किल्ला अतिदुर्गम असून किल्ल्याची व्याप्ती प्रचंड आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी धोकादायक ठिकाणे असून गडावर जाणारी पाऊलवाट अरुंद आहे. याठिकाणी येणारे पर्यटक शिस्तीचे पालन करत नाहीत आणि स्थानिक नागरिकांच्या सूचनांना न जुमानता दुर्लक्ष करत असल्याने वारंवार दुर्घटना घडत आहेत. वनविभागाकडे नावनोंदणी करणे बंधनकारक असतानाही पर्यटक नाव न नोंदवता गडावर जातात. यामुळे गडावर कोण गेले आहे आणि काय चाचले आहे याची नोंद राहत नाही. दुर्घटना घडल्यावर ऐनवेळी स्थानिकांची मात्र धावपळ होते.  

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबई