शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

‘दगडूशेठ’मंदिरातील महिला सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा, गणपती मंदिराच्या परिसरात सापडलेले १२ हजार पोलिसांकडे सुपूर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 14:27 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दर्शनरांगेच्या परिसरात मंदिराच्या महिला सुरक्षारक्षकाला १२ हजार रुपये रोख रक्कम रस्त्यावर पडलेली आढळली.

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दर्शनरांगेच्या परिसरात मंदिराच्या महिला सुरक्षारक्षकाला १२ हजार रुपये रोख रक्कम रस्त्यावर पडलेली आढळली. आजूबाजूला चौकशी केली असता, कोणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षारक्षक रुपाली शेडे यांनी याबाबत ट्रस्टच्या विश्वस्तांना कळविले. एवढी मोठी रक्कम स्वत: न घेता प्रामाणिकपणे फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये जमा करुन शेडे यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून ही रक्कम फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, व्यवस्थापक तानाजी शेजवळ, सुरक्षारक्षक रुपाली शेडे आदी उपस्थित होते.     डॉ. बसवराज तेली यांनी या महिला सुरक्षारक्षकाचे याकामाबाबत कौतुक केले. सुनील रासने म्हणाले, मंदिरामध्ये दिवसभर मोठया प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे गर्दीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. परंतु, ट्रस्टच्या सुरक्षारक्षकांना अशी रक्कम किंवा वस्तू सापडल्यास त्या ट्रस्टकडे जमा केल्या जातात. त्यामुळे सुरक्षारक्षकांकडून ही एक प्रकारे चांगली सेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.