शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक शिक्षकच दुर्लक्षित : ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नको रे बाबा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:49 IST

दरवर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर रोजी जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो.

बी़ एम़ काळे जेजुरी : दरवर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर रोजी जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शासनाच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिले जातात. प्रत्येक तालुक्यात एक मुख्य पुरस्कार आणि दुसरा प्रोत्साहनपर पुरस्कार असे दोनच पुरस्कार दिले जातात. सध्या प्रत्येक तालुक्यातून या पुरस्कारासाठी शिक्षकांची व शाळा तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून मात्र या पुरस्काराबाबत व पुरस्कारासाठी शिफारशी झालेल्या नावांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. पुरस्कार शिक्षकांच्या गुणवत्तेचा, की केंद्रप्रमुखांच्या प्रतिष्ठेचा? प्रामाणिकपणे गुणवत्तेचे कार्य करणारे शिक्षकच दुर्लक्षित राहात असल्याने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नको रे बाबा! अशाच प्रतिक्रिया येत आहेत.‘आदर्श शिक्षकांची अर्थपूर्ण वर्णी’ अशा प्रकारे आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आक्षेप घेत ही निवड व तपासणी अतिशय काटेकोरपणे व पारदर्शक व्हावी अशी अपेक्षा ‘लोकमत’ने (दि.२२) व्यक्त केली होती. मात्र तशा प्रकारे कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. पुरस्कारार्थींची नावे पाठवताना गटशिक्षणाधिकारी यांच्या मर्जीतील व अतिशय घनिष्ठ संबंध असणाºया केंद्रप्रमुखांनी सुचवलेली नावेच अंतिम झाली असल्याने शिक्षणक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.पुरंदरमधून पुणे जिल्हा परिषदेकडे पाच शिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी एक शिक्षक तर पंचायत समितीत कार्यालयातील कामे, दहावी बारावीची आॅक्टोबर तसेच मार्च एप्रिलच्या परीक्षेचे नियोजन उत्कृष्ठरीत्या पार पाडण्याचे तंत्र अवगत असलेला शिक्षक म्हणूनच तालुक्यात प्रसिद्ध आहे. शाळेवर कमी पण कार्यालयीन कामाला जास्त वेळ असणाºया शिक्षकांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा आहे.वरिष्ठांशी घनिष्ठ संबंध असणारे एक पर्यटन व्यावसायिक केंद्रप्रमुख तर वर्षातून अनेक वेळा भारतभ्रमण पर्यटनावरच असतात. मात्र ते अनेक वर्षांपासून आपल्याच केंद्रातील शिक्षकाची शिफारस करण्यास वरिष्ठांना भाग पाडतात व पुरस्कारही मिळवून घेतात. या शिवाय दोन शिक्षकांची नावे गेल्या वर्षीही सुचवण्यात आली होती. पुरस्कारास पात्र न ठरल्याने या वर्षीही पुन्हा नावे पाठवण्यात आली आहेत. या वर्षी पाठवण्यात आलेल्या यादीतील एकाच शिक्षकाचे नाव योग्य असल्याचे शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे.यावषी गुणवत्तेत व लोकसहभागातून शाळा आदर्श करणाºया व जिल्हा परिषद सदस्यांचे गावातीलच एका महिला शिक्षिकेचे नाव शिफारसीसाठी जाणीवपूर्वक डावलल्याने सदर शिक्षिकाही न्याय मागत आहे.तालुका प्रशासनाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप या शिक्षिकेने ‘लोकमत’कडे केला आहे. पुरस्कारासाठी शिफारशी केलेल्या शिक्षकांच्या शाळांची तपासण्या सुरू झाल्या आहेत. यात मुळशी व मावळ या ठिकाणाहून अधिकारी येऊन एका दिवसामध्ये रामवाडी, चिल्हावळी व पानवडी या तीनही शाळांतील शिक्षकांची व गुणवत्तेची पाहणी घाई गडबडीत करतातच कशी? अशी चर्चा आहे. या शिक्षिकेला न्याय मिळावा यासाठी तालुका गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी गेल्या वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी वेगळे होते, या वेळी दुसरे आहेत, त्यामुळे आपण या महिला शिक्षिकेच्या नावाबद्दल वरिष्ठांकडे शिफारस करतो. त्यांनी दखल घेतली तर तपासणी होईल असे सांगितले. या शिक्षिकेला न्याय मिळणार का? अशीच चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक