शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील या पुलावर साकारण्यात आलाय अभियांत्रिकीचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:33 IST

पुण्यातील सीअाेईपी चाैकातील उड्डाणपुलाच्या खांबावर अभियांत्रिकीचा इतिहास उलगडण्यात आला असून ही चित्रे येथून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत अाहेत.

ठळक मुद्देसीअाेईपी महाविद्यालयाचा तसेच अभियांत्रिकीचा इतिहास मांडणारी चित्रे अाली आहेत रेखाटण्यात चित्रांमुळे शहराच्या साैंदर्यात पडतेय भर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्ते व पदपथांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. यात नागरिकांच्या आवडीनिवडींचा विचार करुन जास्तीत जास्त आकर्षक करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या अंतर्गतच पालिकेने अभियांत्रिकी महाविद्यालय(सीओईपी)चौकातील उड्डाणपूल सुशोभित केला असून त्यावर अभियांत्रिकीचा इतिहास उलगडणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. ही चित्रे सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.     सीओईपी चौकातील उड्डाणपुल नव्यानेच बांधण्यात आला आहे. एकावर एक अशी रचना असलेला पुण्यातील हा एकमेव पूल आहे. या पुलाचे खांब हे लांबीला मोठे आहेत आणि उंचही आहेत. या जागेचा स्मार्ट वापर करत या खांबांवर भारतातील पहिले इंजिनिअर ज्यांनी सीओईपीमध्ये शिक्षण घेतले हाेते अश्या सर विश्वेश्वरैया यांचे चित्र काढण्यात आले आहे. त्याचबरोबर सीओईपी तसेच पुणे महापालिकेचा लोगोचे चित्रही येथे पाहायला मिळते. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पावरुन प्रेरणा घेत या खांबांवर विविध फुलांची रोपेही लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अश्या पद्धतीने सुशोभित केलेला हा शहरातील पहिलाच पुल आहे. 

  

 याबाबत बोलताना पुणे महापालिकेच्या पथविभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवरुन प्रेरणा घेत महापालिकेने सीओईपी चौकात विविध चित्रे रेखाटली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी व्हर्टिकल गार्डर्निंगही करण्यात आले आहे. सीओईपी चौक हा शहरातील महत्त्वाचा चौक असल्याने, तसेच येथील खांबांची रुंदी व उंची अधिक असल्याने हा पूल सुशोभिकरणासाठी निवडण्यात आला.    नेहमी धुळीने माखलेले किंवा पान मसाला, गुटखा खाऊन थुंकलेले खांब सगळीकडे पाहायला मिळतात. मात्र पुणे महापालिकेच्या या अनोख्या उपक्रमामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्याचबरोबर या चौकात आल्यानंतर आपण नक्की भारतातच आहोत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 

टॅग्स :Puneपुणेpaintingचित्रकलाhistoryइतिहास