शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक ब्रिटिशकालीन अमृतांजन पुलाची द्विशतकाकडे वाटचाल........

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 13:00 IST

इतिहासाची साक्ष देणारा पूल : पुणे-रायगडला जोडणारा दुवा झाला १८९ वर्षांचा

ठळक मुद्देअमृतांजन पुलाची ऐतिहासिक वारसा यादी नोंद करत त्याचे जतन व संगोपन करावे, अशी मागणी

- विशाल विकारी लोणावळा : पुणे व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा ऐतिहासिक ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल हा रविवारी तब्बल १८९ वर्षांचा झाला. इतिहासाची साक्ष देणारा हा पूल आजही मोठ्या रुबाबात येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करत आहे.पुणे व रायगड जिल्ह्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल खंडाळा घाटात इंग्रज अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी मेजर जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अ‍ॅनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली १८३० मध्ये बोरघाटातील रेल्वेच्या रिव्हसिंग पॉइंट येथे बांधला. १० नोव्हेंबर १८३० मध्ये या पुलाचे लोकार्पण झाले होते. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेला हा प्राचीन पूल ब्रिटिश काळात जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती त्या काळात ब्रिटिशांनी सह्याद्रीची नाळ कोकणाशी जोडण्यासाठी बांधला होता. खंडाळा बोर घाटातील या पुलांवर वेदनानाशक अमृतांजन बामची जाहिरात काही काळ झळकल्यानंतर या पुलाला अमृतांजन पूल हे नाव पडले होते.

रस्ते महामंडळाकडून पूल जुना झाल्याने पाडण्याच्या हालचालीअमृतांजन पुलावरून पूर्वी वाहतूक होत असे कालांतराने हा पूल जीर्ण झाल्याने त्याला समांतर दुसरा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावर उभे राहिले असता निसर्गरम्य खंडाळा घाटातील विहंगम दृष्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यांतून बाहेर पडणारी रेल्वेगाडी आदींचे दर्शन होते. पर्यटकांसाठी तो एक महत्त्वाचा पिकनिक स्पॉट तसेच सेल्फी पॉइंट बनला आहे. मुंबई व कोकणातील जीवघेण्या गरमीमधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या अल्हाददायी वातावरणाचे व थंड हवेचे चुणूक जाणवते. 

मागील काळात हा ऐतिहासिक पूल वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र माध्यमांनी या विरोधात उठविलेला आवाज व नागरिकांच्या हरकतीनंतर निर्णय थांबविण्यात आला. सध्या लोणावळा ते खालापूर दरम्यान मिसिंग लिंकचे काम सुरू असल्याने अमृतांजन पुलाला सध्या तरी कोणता धोका नाही. इतिहासाची साक्ष देणारा तसेच दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या अमृतांजन पुलाची ऐतिहासिक वारसा यादी नोंद करत त्याचे जतन व संगोपन करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाRaigadरायगडAmrutanjan Bridgeअमृतांजन घाट