शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

‘त्यांची’ दिवाळी हक्काच्या घरात, डॉ. आंबेडकरनगरमधील जळीतग्रस्तांना मुस्लिम समाजाकडून घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 02:12 IST

आनंद... अश्रू... समाधान आणि चेहऱ्यावरचे हास्य पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांमधूनही समाधानाचे अश्रू ओघळत होते. निमित्त होते मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर वसाहतीमधील जळीतग्रस्तांना घरवाटपाचे.

पुणे - आनंद... अश्रू... समाधान आणि चेहऱ्यावरचे हास्य पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांमधूनही समाधानाचे अश्रू ओघळत होते. निमित्त होते मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर वसाहतीमधील जळीतग्रस्तांना घरवाटपाचे. एप्रिल महिन्यात लागलेल्या आगीमध्ये संसार उघावर आलेल्या तब्बल ७४ कुटुंबांची दिवाळी मुस्लिम समाजामुळे गोड झाली आहे. बंधूभाव भाईचारा फाउंडेशनच्या वतीने मोफत बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्या रविवारी नूर-ए-हिरा मशिदीमध्ये आयोजित कार्यक्रमात जळीतग्रस्तांना सुपूर्द करण्यात आल्या.२४ एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये ७४ घरे जळाली होती. कष्टकरी आणि गोरगरिबांची कुटुंबे रस्त्यावर आली होती. लहान मुलांच्या डोक्यावरील छतच नियतीने हिसकावून घेतले होते. याच काळात बंधूभाव भाईचाराचे अध्यक्ष शब्बीर शेख यांनी जळीतग्रस्तांची भेट घेत समाजाच्या वतीने घरे बांधून देण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. मात्र, त्यावेळी एसआरएच्या प्रतीक्षेत नागरीक होते. काही दिवसांनी नागरिकांनी शेख यांची भेट घेऊन घरांसंदर्भात चर्चा केली.शेख यांनी त्यांचे सहकारी बाजीलभाई शेख, हाजी जकेरीया मेमन, उस्मान शेख, नूरशेठ सय्यद, तुफेल शेख, नवाज शेख, सलिम मेमन, सादिक शेख, हाजी नजीर सय्यद, सोहेल इनामदार, नदीम शेख आदींशी चर्चा केली. त्यानंतर ही सर्व घरे बांधून देण्याचे ठरले. शहरातील मशिदींमधून नमाजसाठी येणाºया नागरिकांकडून निधी जमा केला.या निधीमधून तीन ते चार महिन्यांत या सर्व घरांचे पक्के बांधकाम करण्यात आले. या कामामध्ये स्थानिक नगरसेवक सुनील कांबळे, मानसी देशपांडे, राजेंद्र शिळीमकर, अनुसया चव्हाण यांची मदत मिळाली.वसुबारसेला चाव्या पडल्या हाती : आतापर्यंत २१२ घरांचे बांधकाम1 रविवारी सकाळी दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात वसुबारसेच्या दिवशीच मार्केट यार्ड येथील नूर-ए-हिरा मशिदीमध्ये जळीतग्रस्तांना चाव्यांचे हस्तांतरण केले. यासोबतच मुस्लिम समाजाकडून दिवाळीची भेट म्हणून महिलांना साडी आणि फराळाचे किटही भेट दिले. जळीतग्रस्तांमध्ये ६४ घरे हिंदूंची तर ४० घरे मुस्लिमांची आहेत.2बंधूभाव भाईचारा फाउंडेशनकडून यापूर्वी गुलटेकडी, भीमनगर, येरवडा, भवानी पेठ येथील जळीतग्रस्तांनाही पक्की घरे बांधून दिली आहेत. गुलटेकडी येथे ६५, भीमनगर ७२, येरवडा ४, भवानी पेठ १ अशी घरे बांधून देण्यात आली आहेत. आजवर एकूण २१२ घरे मोफत बांधून देण्यात आली आहेत.समाजामध्ये बंधूभाव आणि एकता नांदली पाहिजे. इस्लाम धर्म शांतीचा संदेश देतो. मुस्लिम समाजाच्या योगदानातून गोरगरिबांची ही घरे उभी राहिली आहेत. यामधून दोन्ही समाजातील बंधूभाव आणि प्रेम आणखी वृद्धिंगत होईल, असा विश्वास आहे.- शब्बीर शेख, अध्यक्ष,बंधूभाव भाईचारा फाउंडेशनआमच्या घरांना आग लागली. आमची लेकरंबाळंरस्त्यावर आली होती. अंगावरच्या कपड्यांशिवाय घरामध्ये काहीही शिल्लक नव्हतं. बंधूभाव भाईचारा फाउंडेशन आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी आम्हाला पक्की घरे बांधून दिली. आमची घरे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मिळाली याचा खूप खूप आनंद आहे.- मीना उत्तम शिंदे,संगीता पोपट चव्हाण, जळीतग्रस्त

टॅग्स :PuneपुणेHomeघर