पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या जागेवर नव्हे, तर संस्थेच्या शैक्षणिक समितीच्या प्रमुखपदासाठी मला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून विचारणा झाली होती; मात्र चित्रपटातील व्यस्ततेमुळे मी ही जबाबदारी योग्यप्रकारे सांभाळू शकणार नसल्याचे कारण देत स्वीकारण्यास नकार दिल्याचे राजू हिराणी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी तब्बल तीन महिन्यांपासून सुरू केलेल्या आंदोलनावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चौहान यांची हकालपट्टी न करता त्यांना संस्थेपासून दूर ठेवत त्यांच्याकडे केवळ प्रशासकीय कारभार सोपविण्याचे, तर हिराणी यांच्याकडे शैक्षणिक कामकाजाची सूत्रे देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती मिळाली होती. त्याला दुजोरा देत हिराणी यांनी मंगळवारी भूमिका जाहीर केली. चौहान यांच्या जागेवर नाही, मात्र एफटीआयआयच्या शैक्षणिक समितीच्या प्रमुखपदासाठी मंत्रालयाकडून मला विचारणा झाली होती, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)दास यांचे उपोषण मागे : एफटीआयआयच्या विद्यार्थी आंदोलनावर शासनपातळीवर तोडगा न निघाल्याने हताश झालेल्या कंत्राटी प्राध्यापक अभिजित दास यांनी तब्बल ६६ तासांनंतर मंगळवारी उपोषण मागे घेतले.
एफटीआयआय समितीस हिराणी यांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2015 03:31 IST