शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक, माधव गोडबोले यांनी व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:24 IST

विकासाचा मंत्र हा भाजप सरकारच्या धोरणाचा भाग आहे, परंतु त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक आहे, असे माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी येथे सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृह व न्यायसचिव आणि लेखक डॉ. माधव गोडबोले यांच्याशी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला.

पुणे : विकासाचा मंत्र हा भाजप सरकारच्या धोरणाचा भाग आहे, परंतु त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक आहे, असे माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी येथे सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृह व न्यायसचिव आणि लेखक डॉ. माधव गोडबोले यांच्याशी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला. देशात २० टक्के अल्पसंख्यांक आहेत.पुढील १०-१५ वर्षात ही संख्या ३०-३५ टक्क्यांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे भारतात हिंदुत्व ही संकल्पना राबवण्याजोगी नाही. सरकारने धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवणे अत्यंत घातक आहे, अशा शब्दांत गोडबोले यांनी चिंता व्यक्त केली.‘भाजपने लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केले. त्यांचे सरकार येऊन ४ वर्षे झाल्यानंतरही याबाबत काहीच पावले उचलली गेली नाहीत. राजकीय टिपण्णीत अग्रेसर असलेला सोशल मीडिया विधायक बाबतीत सक्रिय दिसत नाही. बोलायचे पुष्कळ आणि करायचे काहीच नाही, हे चित्र आजही कायम आहे.मुख्यमंत्री, पंतप्रधानांची काम करण्याची पध्दत बदलली आहे. कोणत्याही प्रकरणात ‘माझी दिशाभूल करण्यात आली’ असे म्हणण्याची फॅशन रुजली आहे.लोकशाही अस्तित्वात आहे, तोवर उद्योगपतींना काय करूद्यावे, काय करू देऊ नये, याचेदंडक घातले पाहिजेत, अशी अपेक्षाही गोडबोले यांनी बोलून दाखविली....तर बाबरी मशीद वाचवता आली असतीबाबरी मशिदीचे पतन हा भारताला स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा धक्का होता. उत्तर प्रदेशातील राज्य सरकार बरखास्त करण्याची सूचना गृह विभागातर्फे करण्यात आली होती. सरकारला राष्ट्रपती राजवट लागू करता आली असती, असेझाले असते तर बाबरी मशीद वाचवता आली असती.- माधव गोडबोले,माजी केंद्रीय गृहसचिव

टॅग्स :Puneपुणे