शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना ‘हिंदी साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:03 IST

संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे माजी अध्यक्ष, मराठी-हिंदी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि गुरूकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

ठळक मुद्देहिंदी साहित्यात भरीव व मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तीस देण्यात येतो पुरस्कारडॉ. अशोक कामत हे गेल्या अनेक दशकांपासून हिंदी-मराठी साहित्य लेखनात कार्यरत

पुणे : संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे माजी अध्यक्ष, मराठी-हिंदी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि गुरूकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी साहित्यात भरीव व मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी डॉ. कामत यांची निवड करण्यात आली आहे. ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबई येथील रंगशारदा नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. डॉ. अशोक कामत हे गेल्या अनेक दशकांपासून हिंदी-मराठी साहित्य लेखनात कार्यरत आहेत. श्री नामदेव एक विजययात्रा, संत तुकाराम, श्री ज्ञानेश्वर स्वरूप दर्शन अशा १०० हून अधिक मराठी ग्रंथाचे तर मराठी संतो की हिंदी वाणी प्राचीन हिंदी काव्य जीवनधारा आदी ५० हून अधिक हिंदी पुस्तकांचे लेखन-संशोधन करून त्यांनी समाजाला संत साहित्याचे विपुल भांडारच उपलब्ध करून दिले आहे. 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणे