शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

महामार्ग, राज्यमार्ग, बाजारपेठा, आठवडे बाजारांत शुकशुकाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 01:25 IST

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला जिल्ह्यात १००टक्के प्रतिसाद मिळाला.

पुणे : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला जिल्ह्यात १००टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासून सर्व व्यवहार बंद होते. सर्वत्र शांततेत आंदोलन करण्यात आले. सर्व तालुक्यांत तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून, आरक्षणाची मागणी करण्यात आली. बारामतीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या ‘गोविंदबाग’समोर आंदोलकांनी ठिय्या मारला. यात अजित पवार यांनी निवेदन स्वीकारले. सासवडला सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालण्यात आला.‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’, ‘श्री छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, हर हर महादेव’, ‘जय जय जय जिजाऊ’, ‘आले रे आले मावळे आले’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘रक्ता रक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’, ‘धर्मवीर संभाजीमहाराज की जय’, ‘राजमाता जिजाऊ की जय’, आदी घोषणांनी जिल्हा दिवसभर दुमदुमला होता.गेल्या आठवड्यात चाकण येथे आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे सर्र्वांचे चाकणकडे लक्ष लागले होते. पोलिसांनी वारंवार बैैठका घेऊन शांततेचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत येथे शांततेत आंदोलन करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या तुरळक दुचाकी वगळता रस्त्यावर चारचाकी गाड्यांचे दर्शन दुर्लभ झाल्याने पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव रस्ता व चाकण-शिक्रापूर रस्त्यावर शुकशुकाट होता. चाकण औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील यंत्रांचा खडखडाट आज शांत होता. पुण्याच्या चारही दिशेने पुण्यात यायचे म्हटले की, डोळ्यांसमोर उभी राहते महामार्गावरची ‘कोंडी’. यात अडकले की तासभराच्या प्रवासासाठी दररोज लागतात दोनतीन तास; मात्र गुरुवारी सकल मराठा मोर्चाच्या वतीने ‘बंद’ची हाक दिल्याने पुणे जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यात नेहमी गजबजलल्या बाजारपेठा, आठवडे बाजारांसह पुणे-नाशिक, पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा महामार्गावरही शुकशुकाट होता. एकाच दिवशी जिल्ह्यात महामार्गावरचे असे चित्र असण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. गेल्या आठवड्यात चाकण येथे झालेल्या मराठा आंदोलनाच्या वेळी हा तळेगाव चौैक मोर्चेकरांसह वाहनांनी गजबजलेला होता; मात्र गुरुवारी हा चौैक असा ओस पडला होता.>इंदापूर शहरातील पंचायत समितीसमोरील जुना पुणे - सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महामार्गावर अपघात झाल्याने दोन अ‍ॅम्ब्युलन्स जलद गतीने आल्या त्याला आंदोलकांनी त्वरित वाट करून दिली.>सासवडच्या शिवतीर्थावर सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालण्यात आला. पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले.>हवेली तालुक्यात सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपले तालुक्यात महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उरुळी कांचनसह सोरतापवाडी, कुंजीरवाडी, शिंदवणे, कोरेगावमूळ, पेठ, नायगाव, अष्टापूर, भवरापूर , टिळेकरवाडी , पिंपरी सांडस आदी गावांत बंद शांततेत पाळण्यात आला.>भोर शहर १०० टक्के बंद ठेवून सर्व प्रकारच्या व्यापाºयांनी पाठिंबा दिला, तर चौपाटीवरून मोर्चा काढून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चा शांततेत पार पडला.>आंबेगाव तालुक्यात उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला़ मंचर व घोडेगाव शहरात अत्यावश्यक सेवा वगळता १०० टक्के बंद पाळण्यात आला़ मंचर शहरातून मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले़ विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेतला़>शिरूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जागरण गोंधळ, देवीचा गोंधळ, पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.>नारायणगाव व वारूळवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार यांनी दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठा ओस पडल्या होत्या. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

टॅग्स :Puneपुणे