शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात दिल्लीतून येतात सर्वाधिक विमाने; शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 11:46 IST

पुणे विमानतळावरून दिल्लीसह बेंगलुरू, कोलकाता, हैद्राबाद, चेन्नई, लखनऊ, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह १३ हून अधिक शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे.

पुणे : दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला असल्याने देशभरातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट गडद होत चालले आहे. पुणे शहरातही रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती आहे. त्यातच सध्या पुण्यातून ये-जा करणाऱ्या विमानांमध्ये दिल्लीची विमाने सर्वाधिक आहेत. पुणे विमानतळावर शुक्रवारी एकुण ६६ विमानांची ये-जा झाली. त्यामध्ये सर्वाधिक २३ विमाने दिल्लीची होती.

पुणे विमानतळावरून दिल्लीसह बेंगलुरू, कोलकाता, हैद्राबाद, चेन्नई, लखनऊ, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह १३ हून अधिक शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी विमानतळ रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुढील वर्षभर बंद राहणार असल्याने सध्या दररोज केवळ ६० ते ७० विमानांचीच ये-जा होत आहे. पण या विमानांमध्येही जवळपास २० हून अधिक विमाने दिल्लीला ये-जा करणारी आहेत. त्यापाठोपाठ बेंगलुरूसाठी ३ ते ५ तर अन्य शहरांसाठी जास्तीत जास्त २ ते ३ विमाने आहेत. रोजची प्रवासी संख्याही सध्या ७ ते ८ हजारांच्या जवळपास आहे. लॉकडाऊनपुर्वी हा आकडा २० हजारांच्या जवळपास होता.

कोरोनाची भीती कमी होत गेल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ झाली. पण आता पुन्हा दिल्लीसह अन्य काही शहरांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा दिल्लीला मोठा तडाखा बसला आहे. परिणामी, महाराष्ट्रासह काही राज्यांनी दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. पुण्यातही दिल्लीतून दररोज २० हून अधिक विमानांची ये-जा सुरू आहे. त्यातून सुमारे अडीच ते तीन हजार प्रवासी पुण्यात येत आहेत.----------मागील महिन्याच्या मध्यापर्यंत बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचे होम क्वारंटाईन व हातावर शिक्का बंधनकारक होता. पण आता हे बंधनही नाही. त्यामुळे दिल्लीसह अन्य शहरांतून येणारे प्रवासी सहजपणे शहरभर वावरू शकतात. तसेच संबंधित विमानतळांवरही आरोग्य सेतु अ‍ॅप, शरीराचे तापमान आणि मास्क पाहिले जाते.-------------दिल्लीतून ये-जा करणारी विमाने व प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. तसेच येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली नाही.- कुलदीप सिंग, संचालक, पुणे विमानतळ-------------मागील काही दिवसांत दिल्लीतून ये-जा केलेली विमानेदिवस आलेली गेलेली२१ नोव्हेंबर १० ९२० नोव्हेंबर १२ १११९ नोव्हेंबर १२ १११८ नोव्हेंबर १२ १११७ नोव्हेंबर १२ १०-----------------------------------

टॅग्स :Puneपुणेairplaneविमानpune airportपुणे विमानतळcorona virusकोरोना वायरस बातम्या