शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिआत्मविश्वास, अपुरी तयारी नडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 02:27 IST

आशियाडमधील कबड्डीतील पराभवावर प्रतिक्रिया : गुणवान खेळाडूंना सर्वच स्तरावर डावलण्याचा परिणाम

पुणे : इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीतील भारताच्या वर्चस्वाला इराणच्या संघाने सुरूंग लावला. पुरूष आणि महिला या दोन्ही गटांत भारताला विजेतेपदाचा दावेदार समजले जात होते. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अपुरी तयारी भारतीय संघाला नडली. यामुळे दोन्ही गटामध्ये हा संघ इराणविरूद्ध पराभूत झाला, अशी प्रतिक्रिया कबड्डी क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

आशियाई स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत कबड्डीतील सुवर्णपदकापासून वंचित राहिला. या संघाला पुरूष गटात कांस्यपदकावर तर महिला गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरूष गटामध्ये उपांत्य फेरीत इराणने भारताचे आव्हान२७-१८ने संपविले. महिला गटात सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला इराणकडून २७-२४ असा निसटत्या फरकाने पराभूत झाला.अनेक चुका झाल्याखेळाडूंची निवड, अतिआत्मविश्वास आणि योग्य डावपेचातील अपयश पराभवास कारणीभूत ठरले. इराणच्या गुणवान संघाविरूद्ध मागील वेळी अवघ्या एका गुणाने आपण जिंकलो होतो. यातून आपण काहीच बोध घेतला नाही. केवळ प्रो कबड्डी लीगमधील स्टार्सना खेळवणेही भोवले.- शांताराम जाधव,अर्जुन पुरस्कारविजेतेतांत्रिक फरक निर्णायकतांत्रिक गोष्टींतील वर्चस्व हा भारत आणि इराण या संघांतील फरक निर्णायक ठरला. काही वर्षांपासून या देशाने सातत्याने प्रगती केली आहे. तरीही या संघाविरूद्ध आपला खेळ इतका खालावेल, अशी अपेक्षा नव्हती. फिटनेसबाबतीतही आपले दोन्ही संघ मागे होते.- शकुंतला खटावकर,अर्जुन पुरस्कारविजेत्या

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा