उच्च रक्तदाबाची लक्षणे ताबडतोब दिसत नसली तरी त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळेच उच्च रक्तदाबाला ‘सायलंट किलर’ असे म्हटले जाते. मागील पाच वर्षांत रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उच्च रक्तदाब इतर अनेक आजारांना कारणीभूत ठरतो. मधुमेह, रक्तदाबाशी संबंधित समस्या यांसारख्या आजारांनी पीडित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. वेळीच निदान न झाल्यास आणि उपचार न घेतल्यास उच्च रक्तदाब पाचवीला पूजतो. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
चौकट
रक्तदाब वाढण्याची कारणे :
-अनुवंशिकता हे उच्च रक्तदाबामागील मुख्य कारण आहे. आपल्या मागील पिढ्यांना हा त्रास असल्यास आपल्यालाही त्रास उद्भवण्याची शक्यता असते.
-अतिप्रमाणात धूम्रपान, मद्यपान
-आहारात मिठाचा अतिवापर, जंकफूडचे सेवन
- ताणतणाव, बैैठी जीवनशैैली, व्यायामाचा अभाव
-लठ्ठपणा
चौकट
काय काळजी घ्यावी?
- जेवणात मिठाचा अतिरेक टाळावा.
-धूम्रपान, मद्यपान, तंबाखूचे सेवन टाळावे
-वजन संतुलित राखण्यावर भर असावा.
-आहारात पालेभाज्या, कच्च्या भाज्या, कडधान्ये यांचे प्रमाण वाढवावे
-व्यायाम आणि योगासनांवर भर द्यावा
चौकट
“बदललेली जीवनशैैली, धावपळ अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. स्त्री-पुरुष सर्वांनीच आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे. नियमित तपसण्या, डॉक्टरांचा सल्ला यावर भर द्यावा. दैैनंदिन वेळापत्रक आखून त्याप्रमाणे व्यायाम, आहार, शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्याचा प्रयत्न करावा.”
- डॉ. विनीत साळुंखे, जनरल फिजिशियन