शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

अरे, तुझा मास्क कुठंय, उचलायला सांगू का तुला पोलिसांना; बारामतीत अजित पवारांनी घेतली कॅमेरामनची 'शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 12:10 IST

बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान अजितदादांच्या त्याच रोखठोक आणि शिस्तप्रिय स्वभावाचा अनुभव एका वृत्त वाहिनीच्या कॅमेरामनला आला. 

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. आणि कोरोना काळात ते पहिल्या दिवसापासून  नियमांचे पालन करण्यासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले आहे. आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चारचौघात सुनावताना देखील ते मागेपुढे पाहत नाही. आज पुन्हा एकदा बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान अजितदादांच्या त्याच रोखठोक आणि शिस्तप्रिय स्वभावाचा अनुभव एका वृत्त वाहिनीच्या कॅमेरामनला आला. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाषण म्हणजे अस्सल ग्रामीण भाषेतील विनोदाची पाखरण असते. भाषणात बोलता-बोलता दादा अनेकांची फिरकी घेतात. त्यामुळे साहजिकच विनोद निर्माण होतो. तर कधी कधी मिश्किलपणे ते एखाद्याची कानउघाडणी देखील करतात. सहकार व पणन मंडळाच्या बारामती येथील शनिवारी (दि. २८) कार्यक्रमात असाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्किलपणा दिसून आला. 

कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूूचनांचे पालन करा, असे सांगितले. नेमके याच वेळी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनचा मास्क हनुवटीवर असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. ‘अरे मी काय सांगतो. तुझा मास्क कुठाय. तुझ्यामुळे शेजारी असणाऱ्याला कोरोना व्हायचा. उचलायला सांगू का पोलिसांना’ अशा शब्दात कानउघाडणी केली. यावर कार्यक्रमस्थळी हशा देखील पिकला. ------

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना देशात अव्वल ठरला आहे. त्यांच्याकडे सध्या २० लाख साखर पोत्यांचा साठा आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे विचार करा या कारखान्याला किती फायदा होणार आहे. आपल्या तिन्ही साखर कारखान्याचे चेअरमन यांनी पहा जरा कारखान्याचे काम कशा पद्धतीने केले जाते. सहकारमंत्र्यांचा कारखाना एकखांबी आहे. ते म्हणतील ती पूर्व दिशा असते. कारखान्याची निवडणूक सुद्धा बिनविरोध केली जाते. ते सांगतील तो संचालक होतो. मात्र, आपल्याकडे माळेगाव व सोमेश्वरमध्ये सगळा गोंधळच आहे. माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे तर अगदी मेटाकुटीला आले आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व छत्रपती अध्यक्ष प्रशांत काटे यांना कानपिचक्या दिल्या. यावर मात्र कार्यक्रमस्थळी चांगलीच खसखस पिकली. -------सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधानसभेचे तिकीट एका निवडणुकीमध्ये पक्षाने कापले. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी बंडखोरी केली. आम्ही सुद्धा त्यांना ‘करा’ असे म्हणालो. त्यानंतर बाळासाहेब ४३ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी झाले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बाळासाहेब दैवत मानत असल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही. यावर देखील जोरदार हशा पिकला. ------------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या