शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हेरिटेज वॉक; वर्धापनदिनापासून शुभारंभ, भुयाराचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 14:09 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वास्तू व परिसरातील वारसा उलगडून दाखवणारा ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दर महिन्यातून एक दिवस यासाठी निश्चित केला जाणार आहे.

ठळक मुद्देशनिवार, दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यापीठाच्या ६९ व्या वर्धापनदिनी होणार उद्घाटनमुख्य इमारत ते पोतदार संकुल यांना जोडणाऱ्या भुयाराचे असणार खास आकर्षण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वास्तू व परिसरातील वारसा उलगडून दाखवणारा ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दर महिन्यातून एक दिवस यासाठी निश्चित केला जाणार आहे. मुख्य इमारत ते पोतदार संकुल यांना जोडणाऱ्या ३०० फुटाच्या भुयाराचे या वॉकमध्ये खास आकर्षण असणार आहे. याचे उद्घाटन विद्यापीठाच्या ६९ व्या वर्धापनदिनी शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे. विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने हेरिटेज वॉक या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात होत असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या खाली असलेल्या भुयाराचा शोध काही दिवसांपूर्वीच लागला. त्यानंतर या भुयाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मुख्य इमारत व ते पोतदार संकुल यांना जोडणारा ३०० फुटांचा भुयारी मार्ग विद्यापीठाकडून खुला करण्यात येणार आहे. पूर्वी पोतदार संकुल येथे भटारखाना होता, तेथून मुख्य इमारतीमध्ये तयार केलेले जेवण घेऊन जाण्यासाठी भुयाराचा वापर होत होता, अशी माहिती पुढे आली आहे. भुयाराबरोबरच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम, उंच मनोरा, भव्य दालने, त्यातील कलाकुसर, ऐतिहासिक आयुधे व त्यांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. मुख्य इमारतीत नव्याने संग्रहालय उभारण्यात येत आहे. तेथे भूशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास या विषयाच्या काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हेरिटेज वॉकच्या पुढच्या टप्प्यात वनस्पती-प्राणीसंपदा लाभलेला नैसर्गिक वारसा उलगडून दाखवण्यात येणार आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद