शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 14:49 IST

पोलीस प्रशासन आणि मंडळं यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळेच यावर्षी विसर्जनाला विलंब झाला, ही बाब मान्य करावीच लागेल, असे मत दगडूशेठचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

पुणे - मोरया, मोरया... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... च्या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला. अनंत चतुर्दशीला  'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा हजारो मोतिया रंगाच्या व एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री स्वानंदेश रथामध्ये  विराजमान होत सांगता मिरवणुकीत सहभागी झाले. वाजत गाजत आलेली ही गणरायाची स्वारी पाहण्यासोबतच  श्रीं चे दर्शन घेण्याकरिता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. आज सकाळी ११.१५ वाजता दगडूशेठ गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षीपेक्षा यंदा विसर्जनाला उशीर झाल्याचे ट्रस्टनेही मान्य केले.

पोलीस प्रशासन आणि मंडळं यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळेच यावर्षी विसर्जनाला विलंब झाला, ही बाब मान्य करावीच लागेल, असे मत दगडूशेठचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून शनिवारी सकाळी थाटात निघाली. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी अग्रभागी असलेला स्वच्छतेचा संदेश देणारा 'जय गणेश स्वच्छता अभियान रथ' बेलबाग चौकात दाखल झाला. 

बेलबाग चौकामध्ये सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी मुख्य श्री स्वानंदेश रथ दाखल झाला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर पोलीस अधिका-यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. त्यानंतर पुढे हा रथ मार्गस्थ झाला. श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला. रथावर ८ खांब साकारण्यात आले होते.  संपूर्ण रथावर तब्बल १४ शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या. तर, रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या ५ कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले. हा रथ व श्रीं चे विलोभनीय रूप डोळ्यात साठविण्यासोबतच मोबाईल मध्ये देखील अनेकांनी छायाचित्र टिपले. 

सकाळी ११.१५ वाजता विसर्जन

पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील पारंपरिक वेशात मोठया संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी गणेशभक्तांनी श्रीं ची आरती व स्वागत देखील केले. टिळक चौकामध्ये सकाळी १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास मुख्य रथाचे आगमन होताच मोरया, मोरया... जय गणेश असा जयघोष झाला. त्यानंतर ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रीं चे विसर्जन झाले.  

टॅग्स :ganpatiगणपतीDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरPuneपुणेMumbaiमुंबई