शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

स्थायी समिती अध्यक्षपदी पुन्हा हेमंत रासनेंची वर्णी, भाजपमध्ये'नाराजीनाट्य'; तर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी मंजुषा खर्डेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 17:30 IST

भाजपने रासने वगळता अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या सदस्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली संधी..

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत संपल्याने मंगळवारी ( दि. १६)  नव्या ८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपच्या सहा सदस्यांची व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांची नियुक्ती जाहीर झाली. मात्र या निवडीवरून राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. शिवसेना सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. आरपीआयला या स्थायी समितीच्या निवडीत संधीच दिली गेलेली नाही. तसेच सत्ताधारी भाजपमध्ये देखील स्थायी समितीच्या निवडीवरून काही जणांची नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, स्थायीत नाराजी नाट्य सुरु असले तरी शिक्षण मंडळ अध्यक्षपदी कोथरुडच्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांची वर्णी लागणार आहे.

भाजपने रासने वगळता अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या सदस्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी दिली आहे. भाजपच्या नवनियुक्त सदस्यांमध्ये राहुल भंडारे, मनीषा कदम, महेश वाबळे, राजाभाऊ लायगुडे, अर्चना पाटील यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनिल ऊर्फ बंडू गायकवाड, प्रदिप गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये स्थायी समितीच्या विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची पुन्हा स्थायी समितीवर वर्णी लागली आहे. 

......................

शिक्षण समितीवर तेरा सदस्यांची नियुक्ती

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर स्थापन झालेल्या शिक्षण समितीवर मंगळवारी पक्षाच्या सदस्य संख्येनुसार १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेची शिक्षण समिती स्थापन झाली असली तरी, या समितीला कोणतेही आर्थिक बाबतीत अधिकार देण्यात आलेले नाहीत. शिक्षण विभागविषयी कोणताही निर्णय घेतला तरी, त्याच्या आर्थिक तरतुदीकरिता या समितीला स्थायी समितीच्या मान्यतेची आवश्यकता राहणार आहे. पुणे महापालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा आज ऑनलाइन पार पडली. या सभेत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यात भाजपच्या सदस्य संख्येनुसार शिक्षण समितीवरही भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. भाजपाकडून मंजुश्री खर्डेकर, कालिंदा पुंडे, राजश्री काळे, मुक्ता जगताप, मारूती तुपे, अल्पना वर्पे व वर्षा साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, लता धायरकर, सुमन पठारे यांची व काँग्रेसकडून अविनाश बागवे तर शिवसेनेकडून प्राची आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

---------------------------------------------------

समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांना गाडी नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण समितीला कोणतेही आर्थिक अधिकार नसले तरी, या समितीचे कार्यालय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात स्वतंत्ररित्या उभारण्यात येणार आहे. तसेच समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शिक्षण मंडळाकडून चारचाकी वाहन देण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण समिती सदस्य नियुक्ती च्या प्रस्तावाच्यावेळी उपसूचना देण्यात आली. त्यासही सभेत मान्यता देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका