सर्वसामान्य लोकांना मदत हीच खरी देशसेवा आहे, असे प्रतिपादन पुरंदर तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुनीता कोलते यांनी केले.
भिवरी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दिवे - गराडे काँग्रेस जि.प. गटाचे अध्यक्ष भाऊसाहेब दळवी मित्रपरिवारांच्या वतीने व भारती विद्यापीठ मेडीकल फाऊंडेशन संचलित भारती आयुर्वेद हाॅस्पिटलच्या सौजन्याने आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोलते बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी सरचिटणीस गणेश जगताप होते.
यावेळी प्रहार क्रांती संघटना प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे,माजी सरपंच शहाजी लोणकर ,माजी उपसरपंच जगन्नाथ कटके,हनुमंत कामठे ,माऊली दळवी,संभाजी नाटकर,बाळासाहेब नाटकर,प्रकाश कटके ,गणेश दळवी, हनुमंत मानकर , दत्तात्रय ताम्हाणे, हरिदास दळवी,सचिन दळवी,नाना येळवंडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात भिवरी पंचक्रोशीतील १२६ नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घेतली.
प्रास्तविक नानासाहेब येळवंडे यांनी केले. सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले. तर आभार राजेंद्र ताम्हाणे यांनी मानले.
फोटोओळी : भिवरी (ता.पुरंदर) : येथे आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब दळवी मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबिर (छायाचित्र - सुनील लोणकर )
टिप - टिप - दै.लोकमतचे भाऊसाहेब दळवी मिञपरिवार नियमित जाहिरातदार आहेत.कृपया बातमी फोटोओळीसह सविस्तर घ्यावी ही विनंती आहे.