शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

शंभूराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:59 IST

छत्रपती संभाजीमहाराज समाधीस्थळ : शासकीय मानवंदना, पुरस्कार वितरण व विविध कार्यक्रम

कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज यांच्या ३३० व्या बलिदानस्मरणदिनी शुक्रवारी (दि. ५) होणार असून सकाळी मूकपदयात्रा, शासकीय पूजा, शासकीय सलामी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, पुरस्कार वितरण, धर्मसभा, पालखी सोहळा, तसेच विविध कार्यक्रम आयोजिण्यात येणार असून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहेत.

छत्रपती संभाजीमहाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील शंभू छत्रपतींच्या ३३० व्या बलिदानस्मरणदिनानिमित्त शंभूराजांची समाधी, कवी कलश, वीर शिवले यांच्या समाधीवर महाअभिषेक सकाळी सहा वाजता होणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने महिनाभर बलिदान मास पाळण्यात येत असतो. या बलिदानमासाची सांगता मूक पदयात्रेने सकाळी ७ वाजता होणार आहे. सकाळी ८.३० वाजता शासकीय पूजा जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभााकर गावडे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर धर्मवीर श्री शंभू छत्रपती पुण्यस्मरणानिमित्त हभप देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. समाधीस्थळावर केईएम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाधीस्थळावर राज्यभरातून आलेल्या दिंड्या व पालख्यांचे आगमन झाल्यानंतर साडेअकरा वाजता शंभू छत्रपतींची समाधी व पूर्णाकृती पुतळा यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर व्यंकोजीराजे भोसले यांचे १४ वे वंशज महाराज प्रतापसिंह सरफोजीराजे भोसले (तंजावर), प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी कणेरी मठ कोल्हापूर, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांची धर्मसभा पार पडणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी यावर्षीचा धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज पुरस्कार हभप चारुदत्त आफळे व विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना देण्यात येणार आहे. शंभूभक्त अशोक भंडलकर, शंभूसेवा पुरस्कार नवी मुंबई येथील धर्मवीर शंभुराजे उत्सव मंडळ, शंभूभक्त डी. डी. भंडारे शंभूसेवा पुरस्कार पुणे येथील श्रीरंग कलादर्पण यांना व शंभूभक्त गेणू गणपत शिवले शंभूसेवा पुरस्कार तुळापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर तुकाराम शिवले यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी शंभूछत्रपतींवर धर्मवीर बलिदानगीताचे प्रकाशन कवी विनोद पाटणकर, गायक तुषार रिटे यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. त्यानंतर शिवशाहीर हेमंत मावळे यांचा शिवकालीन पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.वढूला तुकोबारायांच्या पालखीतील सर्व दिंड्या आणाव्यातजगद्गुरू तुकोबाराय पालखी सोहळ्यास छत्रपती संभाजीमहाराजांनी संरक्षण दिले असल्याने शंभूछत्रपतींच्या ३३० व्या बलिदानस्मरणदिनी नतमस्तक होण्यासाठी देहू संस्थानतर्फे जगद्गुरू पालखी सोहळ्यातील सर्व दिंडीचालकांनी त्यांच्या दिंड्या आणण्याचे आवाहन करण्यातआले आहे.वढूला येणार राज्यभरातून शक्तीज्योतवढू येथील शंभुराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी धर्मवीर संभाजीमहाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र किल्ले पुरंदर ते श्रीक्षेत्र वढू बुद्रुक - तुळापूर, धर्मवीर संभाजीमहाराज प्रतिष्ठान गोदाकाठ येथून पालखी, श्री शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीची संगमेश्वर ते वढू बुद्रुक पालखी, पुण्यातून हेडगेवार ज्योत, आईसाहेब आध्यात्मिक ज्ञान विज्ञान संस्था वाडे बोल्हाई यांची किल्ले शिवनेरी ते वढू पालखी व राज्यभरातून असंख्य शंभुभक्त ज्योत घेऊन येणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेVadhu Budrukवढू बुद्रुक